वाशिम : करोना महामारीत आरोग्य विभागातील डॉक्टर व सर्वच कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता देवदूत म्हणून अविरत सेवा दिली. मात्र त्यांच्यावरच आज उपोषण करण्याची वेळ येणे दुर्दैवी असून येत्या अधिवेशनात आपल्या प्रश्नावर आवाज उठवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार रोहीत पवार यांनी उपोषणकर्त्यांना दिली.
हेही वाचा – सायबर गुन्हेगाराकडून ११ लाखांनी फसवणूक, पाच दिवसांत पती पत्नीचे बँक खाते रिकामे
हेही वाचा – धान नोंदणीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, मुनगंटीवार यांचा पाठपुरावा
राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने वाशिम येथे आले असता रोहित पवार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. आपल्या मागाण्यांना माझा पाठिंबा आहे. मात्र रुग्णांचा विचार करता उपोषण करणे योग्य वाटत नाही. मागील अनेक दिवसांपासून आपले विविध मागण्यांसाठी उपोषण सुरु आहे. मात्र सरकार गंभीर नाही. त्यामुळे आपल्या मागण्या मी हिवाळी अधिवेशनात मांडेल. आपल्या मागण्या रास्त असून त्या सोडविण्यासाठी आग्रही राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी राज राजपुरकर, अनंता काळे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.