scorecardresearch

Premium

सायबर गुन्हेगाराकडून ११ लाखांनी फसवणूक, पाच दिवसांत पती पत्नीचे बँक खाते रिकामे

आयटी कंपनीत असलेल्या एका व्यक्तीला सायबर गुन्हेगारांनी जाळ्यात ओढले.

husband wife cyber crime, nagpur husband wife cheated
सायबर गुन्हेगाराकडून ११ लाखांनी फसवणूक, पाच दिवसांत पती पत्नीचे बँक खाते रिकामे (संग्रहित छायाचित्र)

नागपूर : आयटी कंपनीत असलेल्या एका व्यक्तीला सायबर गुन्हेगारांनी जाळ्यात ओढले. क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून १० लाख ७३ हजार रुपयांनी फसवणूक केली. त्यांनी स्वत:चे आणि पत्नीच्या बँक खात्यातील संपूर्ण रक्कम सायबर गुन्हेगाराच्या घशात घातली. मात्र, त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ओमकारनगर, अजनी येथील रहिवासी फिर्यादी राजेंद्र वाकोडेकर (३८) हे संगणक प्रोग्राम तयार करण्याचे काम करतात. त्यांना तंत्रज्ञानाविषयी बरीच माहिती आहे. २२ नोव्हेंबर २०२३ ला ते घरी असताना त्यांच्या मोबाईल आरोपीने व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज केला. क्रिप्टो करन्सीला जगभरात प्रचंड मागणी आहे. सध्या क्रिप्टोची किंमत वाढत आहे. ऑनलाईन खरेदी-विक्रीत अनेक गुंतवणूकदार जुळले आहेत. क्रिप्टो सारखी करन्सी आमच्याकडे असून ती खरेदी केल्यास भरघोष नफा मिळेल असे आमिष दाखविले. त्याच्या आमिषाला बळी पडत राजेंद्रने गुंतवणूक केली. लाभ मिळाल्याने फिर्यादीचा विश्वास बसला. त्यांनी पुन्हा गुंतवणुकीची रक्कम वाढविली, पुन्हा लाभ मिळाला. त्यामुळे फिर्यादीचा पक्का विश्वास बसला.

yavatmal theft marathi news, jewellery of rupees 30 lakhs stolen yavatmal marathi news, raymond company s housing colony yavatmal
‘रेमंड’मधील अधिकाऱ्याच्या बंगल्यातून चक्क ३० लाखांचे दागीने लंपास; सुरक्षा भेदून चोरी
texas illegal trading
पत्नीचे कार्यालयीन कॉल ऐकून पतीने शेअर बाजारात कमावले १४ कोटी; भांडाफोड झाल्यावर बसला धक्का
Compensation decision of sugarcane growers Only eight factories are ready to pay after the agitation
ऊस उत्पादकांच्या भरपाई निर्णयास कारखान्यांकडून केराची टोपली; आंदोलनानंतर केवळ आठ कारखान्यांकडून रक्कम देण्याची तयारी
old man arrested for molesting
मुंबई : दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या ५६ वर्षीय व्यक्तीला अटक

हेही वाचा : नागपूर : विवाहितेची आत्महत्या; मैत्रिणीचा पैशांसाठी तगादा

राजेंद्र जाळ्यात अडकल्याचे पाहून आरोपीने त्यांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यांनी स्वतच्या बँक खात्यातील रक्कम गुंतविली. त्यांना लाभ केवळ ऑनलाईन दिसत होता. शिवाय त्यांना इंस्टाग्राम ग्रुपवरही जोडून घेतले. ग्रुपवरील सदस्य लाखांत लाभ झाल्याचे स्क्रीनशॉट टाकत होते. त्यामुळे राजेंद्रनेही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. लाभाची रक्कम काढण्यासाठी पुन्हा गुंतवणूक करण्यास बाध्य केले जात होते. अशा पध्दतीने राजेंद्रने पाच दिवसांत स्वत:चे आणि पत्नीच्या बँक खात्यातील १० लाख ७३ हजार रुपयांची गुंतवणूक केली. आता त्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी काहीच उरले नव्हते. त्यांनी लाभ मागितला असता तो सुध्दा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In nagpur husband wife working in a it company cheated for rupees 11 lakhs by the cyber criminal adk 83 css

First published on: 01-12-2023 at 15:12 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×