गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळावरून प्रदीर्घ कालावधीनंतर शुक्रवारी, १ डिसेंबरला इंडिगो कंपनीच्या प्रवासी विमानाचे ४० प्रवाशांसह आगमन झाले. तर हैदराबाद, तिरुपतीकरिता विमानाने पहिले उड्डाण १२ वाजून ५५ मिनिटांनी केले.

या विमानात गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक लंजे यांच्यासह ५५ प्रवाशांनी प्रवास केला. दरम्यान, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज ही सेवा सुरू होत आहे, ती टिकवून ठेवण्याकरिता आपल्या सर्वांचे सहकार्य लाभले तर भविष्यात गोंंदिया मुंबई सरळ विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. सोबतच मध्यप्रदेश व शेजारील जिल्ह्यातील व्यापारी, अधिकारी व व्यावसायिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. मध्यप्रदेशातील कान्हा केसरी व्याघ्रप्रकल्पाकरिता व नागझिरा नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाकरिता हे विमानतळ जवळचे असल्याने देशातील व विदेशातील पर्यटकांनाही लाभ होणार असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – आमदार केचेंचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनाच आव्हान, काय म्हणाले वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – पोषण आहारात अंडी नको! ‘या’ संघटनांचा वाढता विरोध, ‘हे’ सुचविले पर्याय…

गोंदिया ते हैदराबाद तिरुपती विमानाला खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील मेंढे, जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, माजी आमदार रमेश कुथे यांच्यासह अनेकांनी हिरवी झेंडी दाखवली.