लोकसत्ता टीम

नागपूर: नुकताच एका शिक्षकाने सहावीच्या विद्यार्थिनीवर शाळेतच बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच बहुमजली इमारतीच्या चौकीदारानेच १० वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना उपराजधानीत उघडकीस आली. या घटनेमुळे शाळेसह आता घरातीलही मुलीची सुरक्षा धोक्यात आल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकीदाराला अटक केली. महेश गोपालप्रसाद रहांगडाले (५८) असे आरोपी चौकीदाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लकडगंजमधील एका बहुमजली इमारतीवर महेश रहांगडाले हा चौकीदार आहे. तो पत्नीसह त्या इमारतीच्या खाली असलेल्या एका खोलीत राहतो. इमारतीत राहणाऱ्या एका कुटुंबातील १० वर्षीय मुलगी ११ एप्रिलला रात्री १०.३० वाजता सायकल चालविण्यासाठी खाली उतरली. मुलीने काही वेळ सायकल चालविली आणि थकल्यानंतर ती चौकीदार महेशजवळ बसली. तेवढ्यात महेशच्या मनातील सैतान जागा झाला. त्याची वाईट नजर मुलीवर पडली. त्याने मुलीला पाणी देण्याच्या बहाण्याने घरात नेले. तिथे मुलीवर लैंगिक अत्याचार केला. तिने प्रतिकार केला असता तिला जीवे मारण्याची धमकी दिली. मुलगी घाबरली आणि बाहेर निघून आली.

हेही वाचा…. यवतमाळ: ‘जान देंगे, लेकीन जमीन नही देंगे’; निम्न पैनगंगा प्रकल्प, बुडीत क्षेत्रातील ९५ गावांतील नागरिकांचा ‘एल्गार’

हेही वाचा…. बीएनएचएसचे पक्षीनिरीक्षक ठरले ‘एव्हीयन’ प्रजातीचे साक्षीदार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाहेर काही अंतरावर चौकीदाराची पत्नी माहेश्वरी उभी होती. मुलगी तिच्याकडे गेली आणि महेशने केलेल्या कृत्याचा पाढा वाचला. पतीने केलेल्या कृत्यावर तिने पडदा घालत मुलीलाच दमदाटी केली. घरी आई-बाबांना न सांगण्याची धमकी दिली. भेदरलेल्या अवस्थेत ती मुलगी घरी गेली. तिने घडलेला प्रकार आईवडिलांना सांगितला. त्यांनी महेश आणि माहेश्वरीला जाब विचारला. दोघांनीही चूक कबुल करून माफी मागितली. दाम्पत्यांनी लकडगंज पोलीस ठाणे गाठून महेशविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून महेशला अटक केली. पुढील तपास लकडगंज पोलीस करीत आहेत.