scorecardresearch

Premium

अमरावती : लग्‍नसमारंभात मुलींचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढला, वऱ्हाड्यांनी युवकाला बेदम चोपले

एका लग्‍नसमारंभादरम्‍यान मंगल कार्यालयातील एका खोलीत मुलींचा कपडे बदलतानाचा चोरून व्हिडीओ काढणाऱ्या युवकाला वऱ्हाड्यांनी चोप दिल्‍याची घटना अंजनगाव सुर्जी येथे घडली.

youth take video girls Anjangaon Surji
अमरावती : लग्‍नसमारंभात मुलींचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढला, वऱ्हाड्यांनी युवकाला बेदम चोपले (image – pixabay/प्रातिनिधिक छायाचित्र)

अमरावती : एका लग्‍नसमारंभादरम्‍यान मंगल कार्यालयातील एका खोलीत मुलींचा कपडे बदलतानाचा चोरून व्हिडीओ काढणाऱ्या युवकाला वऱ्हाड्यांनी चोप दिल्‍याची घटना अंजनगाव सुर्जी येथे घडली. आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मोहम्मद फुजेल मो. शौकत (२३, रा. काजीपुरा, इमाम चौक, अंजनगाव सुर्जी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलीचा लग्नसमारंभ तेथीलच एका मंगल कार्यालयात आयोजित करण्‍यात आला होता. गुरुवारी रात्री काही मुली मंगल कार्यालयातील एका खोलीत तयार होत होत्या. त्यावेळी एका तरुणाने खिडकीतून चोरून त्या मुलींचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्‍यावेळी काही वऱ्हाड्यांनी आरोपीला पाहिले. त्‍याला जाब विचारण्‍यात आल्‍यानंतर त्याने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, काही तरुणांनी त्याचा मोबाईल तपासल्‍यावर त्यात रेकार्डिंग दिसून आली. ते कळताच मंगल कार्यालयात गोंधळ उडाला.

Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
jansatta-bhupesh-baghel-interview
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची द इंडियन एक्स्प्रेस ऑनलाईन मीडिया समिटच्या रायपूरमधील ‘मंथन’ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती!

हेही वाचा – नागपूर : शेतकरी महिलेच्या परिश्रमातून फुलली नैसर्गिक शेती

अनेकांनी त्या तरुणाला बेदम चोप दिला.आरोपी तरुणाने मार बसल्यानंतरही ‘तो मी नव्हेच’ असा पवित्रा कायम ठेवला. मात्र, पोलिसी खाक्या दाखवल्‍यानंतर त्याने स्वत:ची ओळख मोहम्मद फुजेल मो. शौकत अशी सांगितली. त्याच्याकडून तीन मोबाईलदेखील जप्त करण्यात आले. पाठोपाठ आरोपीने ज्या मुलींचे कपडे बदलतानाचे रेकॉर्डिंग केले, त्या मुलींची नातेवाईक असलेली ५२ वर्षीय महिला अंजनगाव पोलीस ठाण्यात पोहोचली. आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The incident of youth taking a video of girls changing clothes during a wedding ceremony took place in anjangaon surji mma 73 ssb

First published on: 09-06-2023 at 10:20 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×