चंद्रपूर : उन्हाचा पारा ४३ अंश सेल्सीअस पर्यंत पोहचला आहे. उन्हाच्या तीव्रतेने भूगर्भातील पाणी खोल गेले आहे तर पैनगंगा, वैनगंगा, वर्धा, इरई, झरपट व अंधारी या जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्यांचे पात्र कोरडे पडायला सुरूवात झाली आहे. पाणी टंचाईचा फटका दालमिया सिमेंट भारत लिमिटेड या देशातील आघाडीच्या उद्योग समुहाला बसला आहे.  मंगळवार, १५ एप्रिलच्या संध्याकाळपासून प्लांटमधील उत्पादन पूर्णपणे थांबले आहे.

कोरपना तालुक्यातील नारंडा गावात   दालमिया सिमेंट भारत लिमिटेडचा सिमेंट प्लांट  आहे. त्यासाठी  पैनगंगा नदी पात्रातून  दररोज १५०० किलो लिटर पाण्याची उचल केली जाते. या जलप्रकल्पातून दरवर्षी २.२४ दशलक्ष मेट्रिक टन सिमेंटचे उत्पादन करणे शक्य आहे.

यासोबतच प्लांटमध्ये असलेल्या ३२ मेगावॅट क्षमतेच्या कॅप्टिव्ह पॉवर प्लांटमध्ये पैनगंगा नदीचे पाणीही वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे. उन्हाळा सुरू होताच पैनगंगा नदीची पाणीपातळी कमी होत आहे की प्रकल्प व्यवस्थापन चिंतेत आहे.

प्लांटमध्ये चांगले उत्पादन होत असले तरी मंगळवार १५ एप्रिलच्या सायंकाळपासून अचानक कारखाना बंद करण्याची परिस्थिती  प्रशासनापुढे निर्माण झाली होती. या संदर्भात मी उद्योग विभागाचे जनसंपर्क अधिकारी अरविंद ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मंगळवार सायंकाळपासून पाण्याअभावी सिमेंट प्लांट व वीज युनिट बंद असल्याचे मान्य केले.

ते म्हणाले की, पैनगंगा नदी पात्रातील पाणीसाठा कमी झाला आहे, महिनाभरापूर्वी प्लांट बंद झाला असता, पण मध्येच पाऊस पडल्याने  सुरूच राहिला,  नदी कोरडी पडली होती, प्लांटमधील पाणीपुरवठाही मर्यादित होता, त्यामुळे पाणीपुरवठा होत नव्हता, प्लांट अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

जिल्हाधिकारी म्हणतात…

यासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा यांना विचरणा केली असता, डालमिया सिमेंट कंपनीने पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले असल्याने पाण्याअभावी सिमेंट कारखाना बंद करित असल्याचे पत्र दिल्याचे सांगितले. वैनगगा नदीत काही दिवसांपूर्वीच गोसीखुर्द प्रकल्पातून १ टीएमसी पाणी सोडण्यात आल्याची माहिती दिली.

वर्धा, इरईचे पात्रही कोरडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केवळ पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले नाही तर वैनगंगा नदीचे पात्रही कोरडे पडले आहे.  वैनगंगा सोबतच वर्धा, अंधारी, इरई, झरपट व इतरही नद्यांचे पात्र कोरडे पडले आहे. उन्हाची तीव्रता इतकी आहे की शहरातील मोठे नालेही कोरडे पडले आहेत.