चंद्रपूर : गणेशोत्सव काळात घरी अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. अमर रमेश आत्राम (१९, रा. कोहपरा ता. राजुरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. शस्त्र जप्त करण्याची तीन दिवसांतील ही दुसरी कारवाई आहे.

गणेश उत्सवादरम्यान समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ‘भयमुक्त गणेश उत्सव’ संकल्पनेतून पोलीस अधीक्षकांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगाराविरुद्ध विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना दिले होते. अमर आत्राम हा युवक आपल्या घरी अवैध अग्निशस्त्र लपवून ठेवल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. युवकाच्या घरी छापा टाकून झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र व मोबाईल असा एकूण २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा – नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस! सर्वाधिक फटका मध्य नागपूरला; पंचशील चौक परिसरातील अनेक रुग्णालयांमध्ये पाणी

हेही वाचा – शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपीविरुद्ध विरूर स्टे येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. यापूर्वी १८ सप्टेंबर रोजी राजुरा येथे राजरतन राहुल बनकर याच्याकडून एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र व एक जिवंत काळतुस जप्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोलीस उपनिरीक्षक अतुल विनायक कावळे, अनुप डागे, जमिर पठाण, नितेश महात्मे, मिलिंद चव्हाण, प्रसाद धुळगंडे, दिनेश अराडे आदींनी केली.