scorecardresearch

Premium

शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे…

सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी ही मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

disqualified MLA in Shivena
शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे… (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

नागपूर : शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी ही मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

राज्याच्या इतिहासातील मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष सुनावणीकडे लागले आहे.

Report of NCSC submitted in the case of violence in West Bengal
राष्ट्रपती राजवटीची शिफारस; पश्चिम बंगालमधील हिंसाचारप्रकरणी ‘एनसीएससी’चा अहवाल सादर
maharashtra s first woman battalion marathi news, maharashtra first woman battalion marathi news
गृहमंत्रालयाचे नकारात्मक धोरण मूळावर, पहिल्या महिला बटालियनची राज्याला अद्यापही प्रतीक्षा
Rohit Pawar
“…तरी पक्षाचा बाप आमच्याबरोबर आहे!”, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर रोहित पवारांची पोस्ट चर्चेत
cipher case in pakistan
विश्लेषण : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेले ‘सिफर प्रकरण’ नेमके काय आहे?

हेही वाचा – हे गणराया, भाजपा नेत्यांना सुबुद्धी दे – खासदार सुप्रिया सुळे

संवैधानिक संस्था, संवैधानिक पदे आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करावे ही मागणी विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केलेली आहे.

disqualified MLA in Shivena

हेही वाचा – वेबसिरीजमध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषाने अभिनेत्रीची ऑनलाइन फसवणूक

विधानसभा अध्यक्ष ही मागणी मान्य करून आपल्या पारदर्शक कारभाराचा परिचय देतील ही आशा आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vijay vadettiwar demand to hear the case of disqualified mla in shivsena through online live broadcast rbt 74 ssb

First published on: 23-09-2023 at 11:53 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×