गोंदिया : रविवार १६ जुलै आणि त्यानंतर परत सोमवार १७ जुलैला अजित पवार गटाकडून दोन्ही गटांचे एकत्रीकरणाने मनोमिलनचे प्रयत्न अपयशी ठरले आणि त्यानंतर गोंदिया जिल्ह्यात म्हणजेच प्रफुल पटेलांच्या गृह जिल्हात गोंदिया नगरीत पण शरद पवार यांच्या गटाचा मेळावा होणार, असे निश्चित करण्यात आले. त्यामुळे आता प्रफुल पटेलांच्या गोंदिया जिल्ह्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली आहे.

शरद पवार गटाचे नेतृत्व सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव पदावर विराजमान असलेले वरिष्ठ नेते वीरेंद्र जायस्वाल यांनी शरद पवार गटाच्या मेळाव्याचे आयोजन २८ जुलैला होणार असल्याचे तसेच या मेळाव्याला स्वत: शरद पवार, कार्यकारी अध्यक्ष खा.सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती राहणार व याच मेळाव्यात जिल्हा कार्यकारिणी ची घोषणा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव वीरेंद्र जायसवाल यांनी दिली.

हेही वाचा >>>सत्ताधारी पक्षाचेच आमदार शासनाविरोधात आंदोलन करणार, कारण काय वाचा…

२ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन गट पडले. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यात अजित पवार गटाचे प्रफुल पटेलांच्या विरोधात कोण पुढे येणार हा चर्चेचा विषय झाला होता. तसेच पंधरवडा उलटून सुद्धा गोंदिया जिल्ह्यात शरद पवार गटाचा कोण होईल असे वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सचिव वीरेंद्र जायसवाल यांनी पुढाकार घेत शरद पवार गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला, पण मागील दोन दिवस एकत्रीकरण व मनोमिलन यांच्यात गेल्यानंतर सुद्धा पुढील काहीच निर्णय झाला नाही.

हेही वाचा >>>नागपूर: महापालिका शिक्षक भरतीत पात्रतेच्या निकषाचा घोळ; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर गोंदियातील शरद पवार यांचा झेंडा हाती घेणाऱ्यांना पुढील कार्यक्रम मिळाला आणि त्यांनी आज २८ जुलै ला गोंदिया जिल्ह्यात शरद पवार गटाच्या मेळाव्याची घोषणा केली. यामुळे आता प्रफुल पटेलांच्या गृह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस ही दुभंगली आहे.