२४ तासांत ३० मृत्यू; नवीन १,१३३ रुग्णांची भर

नागपूर : जिल्ह्य़ात करोनाचा प्रभाव ओसरत असून सलग दुसऱ्या दिवशी मृत्यू व नवीन रुग्णसंख्या कमी नोंदवली गेली आहे. २४ तासांत येथे ३० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू तर १ हजार १३३ नवीन रुग्णांची भर पडली आहे. शहरात केवळ ९ रुग्णांचा मृत्यू झाला असून ही १८ मार्च २०२१ नंतरची सर्वात कमी मृत्यूसंख्या आहे. दरम्यान, सतत नवीन रुग्णांहून करोनामुक्त अधिक असल्याने सक्रिय उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होऊन ३० हजाराहून खाली गेली आहे.

जिल्ह्य़ात १७ मार्च २०२१ रोजी १६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात शहरातील ८, ग्रामीणचे ५, जिल्ह्य़ाबाहेरील ३ मृत्यूंचा समावेश होता. त्यांतर १८ मार्चला जिल्ह्य़ात झालेल्या २३ मृत्यूंत शहरातील १४, ग्रामीण ६, जिल्ह्य़ाबाहेरील ३ मृत्यूंचा समावेश होता. त्यांतर जिल्ह्य़ात करोनाचा उद्रेक झाला होता. त्यामुळे सातत्याने रुग्ण वाढत असतानाच आता गेल्या काही दिवसांपासून पुन्हा नवीन रुग्ण व मृत्यू कमी होताना दिसत आहे. रविवारी २४ तासांत शहरात ९, ग्रामीण १०, जिल्ह्य़ाबाहेरील ११ असे एकूण ३० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ५ हजार १२६, ग्रामीण २ हजार १७५, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार २४९ अशी एकूण ८ हजार ५५० रुग्णांवर पोहचली, तर दिवसभरात शहरात ७२६, ग्रामीण ३९६, जिल्ह्य़ाबाहेरील ११ असे एकूण १ हजार १३३ रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख २५ हजार ७५७, ग्रामीण १ लाख ३६ हजार ५५, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ४३१ अशी एकूण ४ लाख ६३ हजार २४३ रुग्णांवर पोहचली आहे. दरम्यान, सतत नवीन रुग्णांहून करोनामुक्त अधिक होत असल्याने शहरातील सक्रीय उपचाराधीन रुग्णांची संख्या १५ हजार १२, ग्रामीण १४ हजार ८३१ अशी एकून जिल्ह्य़ात २९ हजार ८४३ रुग्णांवर पोहचली आहे.

नवीन रुग्णांहून चौपट करोनामुक्त

शहरात दिवसभरात २ हजार ७०५, ग्रामीणला १ हजार ८१४ असे एकूण जिल्ह्य़ात ४ हजार ५१९ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख ५ हजार ८७६, ग्रामीण १ लाख १८ हजार ९७४ अशी एकूण जिल्ह्य़ात ४ लाख २४ हजार ८५० व्यक्तींवर पोहचली आहे. दरम्यान आज आढळलेल्या १,१३३ नवीन करोनाग्रस्तांच्या तुलनेत करोनामुक्तांची संख्या चार पटींहून अधिक आहे.

सकारात्मक अहवालाचे प्रमाण घटले

शहरात दिवसभरात १० हजार ६२५, ग्रामीणला ४ हजार ९३१ अशा एकूण १५ हजार ५५४ संशयित व्यक्तींनी चाचणीसाठी नमुने दिले. त्याचे अहवाल सोमवारी अपेक्षित आहे. परंतु शनिवारी तपासलेल्या ११ हजार ६११ नमुन्यांत १ हजार १३३ रुग्णांना करोना असल्याचे निदान झाले. हे सकारात्मक अहवालाचे प्रमाण ९.७५ टक्के आहे.

खाटा, औषध, रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधा

’ शासकीय आणि खासगी रुग्णालयात खाटा मिळण्यासाठी : ०७१२-२५६७०२१ / ७७७००११५३७ / ७७७००११४७२

’ औषधे व प्राणवायू मिळण्यासाठी  : ०७१२-२५५१८६६ / ७७७००११९७४

’ रुग्णवाहिकेसाठी : ०७१२-२५५१४१७ / ९०९६१५९४७२