लोकसत्ता टीम

नागपूर: शहरातील गणेशपेठ बस स्थानक परिसरासह अन्य भागात अवैधरित्या रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या खासगी बसेसमुळे परिसरात नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. अशा खासगी बसेसवर कडक कारवाई करा, खाजगी बसेसचा परवाना आणि परमीट रद्द करा, अशा सूचना
दिल्या जाणार आहेत.

गणेशपेठ बसस्थानक परिसरासह रहाटे कॉलनी, गांधीबाग, घाट रोड, वर्धा रोड, अमरावती रोड, धरमपेठ येथे खासगी बसेसच्या रस्त्यावरील पार्कींगमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी व यासंदर्भात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सिव्हिल लाईन्स येथील उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मानद सचिव माजी महापौर संदीप जोशी यांनी विशेष बैठक घेतली.

हेही वाचा… प्लास्टिकचे आक्रमण कायमच, बंदीचा उडाला फज्जा! बंदीच्या निर्णयाला पाच वर्ष पूर्ण

गणेशपेठ बस स्थानक परिसरात खासगी बसेसच्या अवैध पार्कींगमुळे परिसरात नेहमीच वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागते. या ठिकाणी रस्त्यावर केली जाणारी खासगी बसेसची पार्कींग ही अत्यंत गंभीर बाब असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही या अवैध पार्कींगचा फटका बसला आहे व त्यांनी देखील या अवैध पार्कींगवर नाराजी व्यक्त केली आहे, असे संदीप जोशी यांनी सांगितले. मुख्य बसस्थानकावर दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. येथे असलेल्या वाहतूक कोंडीमुळे दुर्दैवाने एखादा अपघात झाल्यास नागरिकही माफ करणार नाहीत. त्यामुळे पुढील धोका टाळला जावा याकरिता तातडीने आजपासून रस्त्यावर बसेस पार्क करणाऱ्यांवर धडकरित्या कारवाई करण्याची सूचना जोशी यांनी केली.

हेही वाचा… नागपूर : डान्सबारमधील बारबालावर उधळल्या लुटीच्या नोटा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बस स्थानक परिसरात २०० मीटर पर्यंत कुठलेही वाहन थांबवून न ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र या आदेशाची पायमल्ली करून सर्रासपणे रस्त्यावरच खासगी बसेस पार्क केल्या जात आहेत. ही गंभीर बाब असून रस्त्यावर बसेस पार्क करणाऱ्यांचे परवाने आणि परमीट रद्द करण्यात यावेत. तसेच सदर विषयाच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करतानाच खासगी बसेसच्या पार्कींग करिता लवकरात लवकर पर्यायी जागा देखील शोधण्यात यावी, असेही उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी अधिकाऱ्यांना सूचित केले.