scorecardresearch

नागपूर येथील शासकीय निवासस्थानातून चंदनाच्या झाडांची कत्तल करणाऱ्याला पोलिसांकडून अटक

यापूर्वी चंदन तस्करांनी राज्यपाल भवनातील सहाच्यावर चंदन झाडे तोडली होती.

नागपूर येथील शासकीय निवासस्थानातून चंदनाच्या झाडांची कत्तल करणाऱ्याला पोलिसांकडून अटक
प्रातिनिधिक छायाचित्र / लोकसत्ता

नागपूर : शासकीय निवासस्थानातून चंदनाच्या झाडांची कत्तल करून चंदन चोरी करणाऱ्याला सीताबर्डी पोलिसांनी पाठलाग करून मुसक्या आवळल्या. आसीफ पठाण (२४) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.
चंदन तस्करांची आंतरराज्यीय टोळी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पळून गेलेल्या आरोपीच्या शोधासाठी एक पथक रवाना झाले आहे.

सीसीटीव्ही, मोबाईल तसेच टॉवर लोकेशनद्वारे तपास सुरू आहे. एक पथक चोरट्यांच्या शोधासाठी रवाना झाले आहे. सिव्हिल लाईन परिसरात केंद्र आणि राज्य शासनाची कार्यालय, तसेच अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. राज्यपाल भवन, पोलीस आयुक्त कार्यालय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, डीआरएम यांचे बंगले आहेत. यापूर्वी चंदन तस्करांनी राज्यपाल भवनातील सहाच्यावर चंदन झाडे तोडली होती. आरोपी दुपारच्या सुमारास चंदनाच्या झाडांची रेकी केल्यानंतर मध्यरात्री इलेक्ट्रिक किंवा बॅटरीवर चालणाऱ्या आरीने ते झाड कापायचे. विशेष म्हणजे तोडण्यायोग्य आणि विक्रीयोग्य वाढ झालेले झाडच कापत होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या