वाशिम : सध्या सर्वत्र लग्न सराईची लगबग चालू आहे. त्यातच लोकसभा निवडणूक असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आलेले असल्याने सर्वच वाहणाची कसून चौकशी सुरु आहे. त्यामुळे नवरदेव प्रवास करत असलेली गाडी वाशीम हिंगोली महामार्गावरच्या राजगाव चेक पोस्टवर तपासण्यात आली.

जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील धनज बुद्रुक चेकपोस्टवर अमरावती येथून वाशीम कडेयेत असलेल्या एका वाहनातून ३६ लाख रुपयांची रोकड पकडण्यात आल्यानंतर आता जिल्ह्यातील सर्वच सीमेवर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. यामध्ये अगदी लग्न समारंभाच्या गाड्यासुद्धा तपासल्या जात आहेत. यामुळे वऱ्हाड घेऊन जात असलेला एक नवरदेव प्रवास करत असलेली गाडी वाशीम हिंगोली महामार्गाजवळील राजगाव चेक पोस्टवर तपासण्यात आली. अगदी नवरदेवाला खाली उतरवून संपूर्ण गाडीची झडती घेण्यात आली. तर शेवटी पोलिसांनी नवरदेवाला लग्नासाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी अगदी आनंदात नवरदेवाची गाडी पुढे निघून गेली.

हेही वाचा – उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – गडचिरोलीत ‘इंडिया’ आघाडीत फूट, शेकाप नेत्याचे गंभीर आरोप; दोन दिवसांत जिल्हा समिती निर्णय घेणार!

चेकपोस्टवर वाहणाची तपासणी

उन्हाळ्याचे दिवस म्हटले की लग्नाची धामधूम असते. वाहणांची रेलचेल असते. त्यातच जिल्ह्यात चेकपोस्ट लावण्यात आले असून वाहणाची कसून तपासणी केली जात आहे.