नागपूर: आष्टीतील भवन्स शाळेतील विद्यार्थी सारंग नागपुरे याच्या मृत्यूमुळे शहरातील पालक वर्ग चिंतेत असतानाच आणखी एका घटनेने पालक वर्गाच्या चिंतेत भर घातली आहे. नंदनवनमधील स्टार पॉईंट शाळेतील एका विद्यार्थिनीशी शाळेच्या सुरक्षारक्षकाने अश्लील वर्तन केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. अनिल चव्हाण असे आरोपी सुरक्षारक्षकाचे नाव आहे.

नंदनवनचे ठाणेदार गजानन कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी नंदनवनमधील स्टार पॉईंट शाळेत शिकते. त्या शाळेवर अनिल चव्हाण हा सुरक्षारक्षक पदावर नोकरी करतो. गेल्या २६ ऑक्टोबरला पीडित विद्यार्थीनी शाळेत आली होती. शाळा सुटल्यानंतर आरोपी सुरक्षारक्षकाने त्या चिमुकलीशी अश्लील वर्तन केले. त्यामुळे मुलीने रडत-रडत आपल्या पालकांना सांगितले.

हेही वाचा… वाशिम: आरोग्य विभागातील ६०० डॉक्टर, कर्मचारी बेमुदत संपावर; आरोग्य यंत्रणा सलाईनवर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहानिशा केल्यानंतर सुरक्षारक्षक चव्हाण याची कानउघडणी करण्यात आली. पालकांनी ३१ ऑक्टोबरला नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून सुरक्षारक्षक अनिल चव्हाणला अटक केली. सध्या त्या सुरक्षारक्षकाची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.