यवतमाळ: महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरीचे कामाच्या मजुरांच्या जॉब कार्डवर सही करण्यासाठी १० हजार रुपयाची लाच स्वीकारताना उमरखेड तालुक्यातील कोपरा खुर्द (कृष्णापूर) येथील सरपंचाला रंगेहात पकडण्यात आले.

बुधवारी सायंकाळी ढाणकी-उमरखेडरोडवरील गादीया ले-आउटच्या मोकळ्या जागेत एसबीच्या पथकाने ही कारवाई केली.सुनील शंकर वाघमारे (३८), असे लाचखोर सरपंचाचे नाव आहे.

हेही वाचा… देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर इमर्जन्सी अलर्ट; स्थानिक गुन्हे शाखेचे घाबरु नका असे आवाहन

तक्रारकर्त्याच्या आईच्या नावे मंजूर झालेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरीचे कामगार लावून केलेल्या कामांच्या मजुरांच्या जॉब कार्डवर सही करण्यासाठी सरपंच सुनील वाघमारे याने १० हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली, अशी तक्रार सोमवारी यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

हेही वाचा… गोंदिया: चालत्या स्कुटीला अचानक लागली आग; गाडी जळून झाली झाली राख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानुसार बुधवारी पडताळणीदरम्यान पंचासमक्ष सरपंच सुनील वाघमारे याने १० हजाराची लाच स्विकारताच एसीबीच्या अधिकार्‍यांनी रक्कमेसह सरपंचाला ताब्यात घेतले. याप्रकरणी बिटरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर, अमित वानखेडे, सचिन भोयर, महेश वाकोडे, अब्दुल वसीम, भागवत पाटील, संजय कांबळे आदींनी केली.