अमरावती : दारूच्या आहारी गेलेल्या पित्‍याची तरूण मुलानेच चुलतभावाच्‍या मदतीने हत्‍या केल्‍याची घटना कुऱ्हा पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील तरोडा जगताप शिवारात घडली. पोलिसांना शनिवारी एका शेतात मृतदेह आढळून आला होता, हत्‍येचा संशय असल्‍याने पोलिसांनी तपास सुरू केला, त्‍यात या घटनेचा उलगडा झाला.

सतीश गंगाधर कुरटकार (४२,रा. जळगाव आर्वी, ता. धामणगाव रेल्वे) असे मृताचे नाव आहे. मृताची ओळख पटल्यानंतर कुऱ्हा पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून मृत सतीशचा मुलगा अभी कुरटकर (१९, रा. जळगाव आर्वी) व पुतण्या यश जगदीश कुरटकार (१९, रा. खडकसावंगा, बाभुळगाव) यांच्याविरूध्द कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही तातडीने अटक केली. मृताची ओळख पटवून कुऱ्हा पोलिसांनी दोन्ही आरोपींना हुडकून काढले. सतीश कुरटकर हा दारूच्या आहारी गेला होता. तो दारू पिऊन नेहमीच वाद करायचा. त्यामुळे कुरटकर कुटुंबीय त्रस्‍त झाले होते, त्यामुळे सतीशची हत्‍या केल्याची कबुली दोन्ही आरोपींनी दिली आहे.

Shatrughan Sinha condemns firing outside Salman Khan home
“या भ्याड हल्ल्याचा…”, शत्रुघ्न सिन्हांची सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराबद्दल प्रतिक्रिया; म्हणाले, “मला या…”
Firing over a petty dispute at Antop Hill
ॲन्टॉप हिल येथे किरकोळ वादातून गोळीबार
young man murdered by throat slit in Ichalkaranjit two accuse were arrested
इचलकरंजीत क्षुल्लक कारणातून तरुणाचा गळा चिरुन खून; दोघांना अटक
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या