भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात २६ फेब्रुवारी २०१४ मध्ये झालेल्या सोनी हत्याकांडाचा अखेर ९ वर्षांनी निकाल लागला आहे. तुमसर येथे नऊ वर्षांपूर्वी सराफा व्यावसायिक, त्याची पत्नी व मुलगा यांच्या हत्येप्रकरणी भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाने सात जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

हा निर्णय दुपारी तीन वाजता जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांनी सुनावला. हत्याकांड्याच्या तब्बल नऊ वर्षापर्यंत नंतर या प्रकरणात आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्यांमध्ये शहानवाज ऊर्फ बाबू सत्तार शेख (३२), महेश सुभाष आगासे (३५), सलीम नजीम खा पठाण (३४), राहुल गोपीचंद पडोळे (३२), मोहम्मद अफरोज ऊर्फ सोहेल युसूफ शेख (३४), शेख रफिक शेख रहमान (४५) व केसरी मनोहर ढोले (३४) अशी नावे आहेत.

हेही वाचा…. नागपूर: महापुरुषांच्या विचाराचा प्रसार करणारी महावितरणची अभ्यासिका, काय आहे संकल्पना ?

हेही वाचा…. रणरणत्या उन्हात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा; १२६ सरपंच जनतेतून निवडले जाणार, ३६६६ सदस्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी याप्रकरणी बाजू मांडली आणि सातही आरोपींना दोषी सिद्ध केले. २५ फेब्रुवारी २०१४ मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास तुमसर येथील प्रतिष्ठित सराफा व्यावसायिक संजय चिमणलाल रानपुरा (सोनी) (४७) त्यांची पत्नी पूनम संजय रानपुरा (४३) व त्यांचा मुलगा दुर्मिळ संजय रानपुरा (१२) याची यांची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर अवघ्या २४ तासात तुमसर पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. यापैकी एकाला मुंबईतून अटक करण्यात आली होती. हत्येनंतर आरोपींनी ८.३ किलो सोने चांदीचे दागिने व ३९ लाख रुपयांची रोख चोरून नेली होती.