लोकसत्ता टीम
वर्धा: वर्धा नागपूर मार्गावर मंगळवारी रात्री दीड वाजता आक्रितच घडले. नागपुरातून वर्धेला येणार एम एच ३२ ए जे ४४५३ या क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगात येत होता.
एकाएकी तो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुभाजकास धडकला. लगेच त्यात आग उसळली. नेमके कारण पुढे आले नाही. मात्र अपघात चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हेही वाचा… चंद्रपूर : नऊ महिन्यांत १० लक्ष २६ हजार ज्येष्ठ नागरिकांनी केला लालपरीने मोफत प्रवास
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
एका तासानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या आल्यानंतर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र पहाटेपर्यंत आग धुमसत रहल्याने ट्रक जळून बेचिराख झाला. सेलू पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे.