नागपूर: राज्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा केला जातो. दरम्यान विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून या दिवशी विदर्भात स्वतंत्र विदर्भ राज्याचा काळा झेंडा फडकवण्याची घोषणा केली गेली आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवरून राज्यात पून्हा वातावरण तापण्याचे संकेत आहे

विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून बुधवारी (३० एप्रिल) नागपुरात महाराष्ट्र दिनाचा निषेध करीत १ मे रोजी नागपुरातील संविधान चौकात विदर्भाचा झेंडा फडकविण्याचा निर्धार केला गेला. आंदोलनानिमित्त समितीच्या बॅनरखाली सर्व कार्यकर्ते डोक्याला व दंडाला काळी फीत, या व्यतिरिक्त काळे कपडे धारण करणार आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने सांगितले की, १ मे १९६० रोजी विदर्भाच्या जनतेला न विचारता महाराष्ट्रात धकलण्यात आले. व त्या दिवसा पासून विदर्भाची अधोगती सुरूच आहे. विदर्भाचा बॅकलॉग दिवसन दिवस वाढतच चालला आहे.

आज राज्यावर ७ लाख ८२ हजार कोटींचा कर्जाचा डोंगर असून, राज्याचा अर्थसंकल्प ४५ हजार ८९२ कोटी रुपये तुटीचा आहे. महाराष्ट्र राज्याचे महसूली उत्पन्न ५ लाख ६० हजार ९६३ कोटी असून, वर्षाचा खर्च भागविण्यास ६ लाख ६ हजार ८५५ कोटी लागणार आहे. म्हणून विदर्भातील गोसेखुर्द सह १३१ सिंचन प्रकल्प पूर्ण होने अशक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चे सत्र सुरूच राहणार. बेरोजगारांना येथे नोकरी मिळणे नाही. प्रदूषण कुपोषण थांबणार नाही. वीज स्वस्त होणार नाही. नक्षलवाद संपणार नाही. विदर्भाचा विकास होने अश्यक्य आहे. म्हणून विदर्भाचे स्वतंत्र राज्य झालेच पाहिजे.

दरम्यान आंदोलनानिमित्त संविधान चौक येथे झेंडा फडकविन्यासाठी विराआसच्या वतीने पूर्व विदर्भ विभाग अध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, पूर्व विदर्भ उपाध्यक्ष सुनील चोखारे, जेष्ठ विदर्भवादी बाबा शेळके, अहमद कादर, नागपूर शहर अध्यक्ष नरेश निमजे, नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत नखाते, नागपूर शहर महिला अध्यक्ष ज्योती खांडेकर, गुलाबराव धांडे, गणेश शर्मा, गिरीश तितरमारे,अमूल साकुरे, राजेंद्र सतई, रवींद्र भामोडे, हरिभाऊ पानबुडे, लता अवजेकर, प्यारू भाई उर्फ नौशाद हुसैन, भरत बविस्टाले, नीलकंठ अंबोरे, माधुरी चौहान, किशोर कुर्वे, भोजराज सरोदे यांनी कार्यकर्त्यांना आव्हान केले आहे.