यवतमाळ : ग्रामीण भागातून ‘तो’ आपल्या कर्तृत्वाने थेट दिल्लीत पोहोचला. त्याने तिथे एका नामांकित कंपनीत अभियंतापदी नोकरी स्वीकारली. त्याच्या यशाने इकडे गावात चार चाँद लावले. मात्र या तरुणाच्या यशात त्याची कंपनीच आडवी आली. कामाचा ताण असह्य झाल्याने त्याने स्वत:लाच संपविले आणि त्याच्यासह कुटुंबीयांच्या स्वप्नांचाही चुराडा झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्णी तालुक्यातील जांब येथील क्षीतिज प्रमोद इंगोले (२२) असे मृत तरूणाचे नाव आहे. त्याने बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी दिल्लीत राहत असलेल्या इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. क्षीतिज दिल्ली येथे एचसीएल कंपनीत कार्यरत होता. जांब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने जवळा येथील गुरूदेव विद्या मंदिर येथे दहावीपर्यंतचे  शिक्षण घेतले. अमरावती येथे संगणक अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर नामांकित कपंनीत नोकरीस लागला.

हेही वाचा >>> “अनिल देशमुख यांचे मतदारसंघात जल्लोषात स्वागत”, जाहीर सभेत म्हणाले, आम्ही अग्निपरीक्षेला…

दिल्ली येथे नोकरीला लागल्यानंतर कुटुंबीयांनाही मोठा आनंद झाला होता. सर्व सुरळीत सुरू असताना क्षीतिजने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचचले, हा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांनाही पडला आहे. मृत्यूपूर्वी त्याने लिहून ठेवलेले चार पानी पत्रही सापडले असून त्यात त्याने कंपनीच्या कामाचा तणाव असल्याचे नमूद केले आहे. कुटुंबाविषयी लिहून त्याने आपल्या मृत्यूस कोणासही जबाबदार ठरवू नये, असेही त्याने नमूद केले आहे. तो आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The young engineer yavatmal suicide because of work pressure nrp 78 ysh
First published on: 18-02-2023 at 12:43 IST