शुल्लक कारणावरून वाद घालून एका युवकाला धावत्या रेल्वेगाडीतून फेकून दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरीजवळ गुरूवारी घडली. यात अकोला येथील शेख अकबर या तरुणाचा जीव गेला. शेख अकबर हा बाबा ताजाद्दीन यांच्या ऊर्ससाठी गरीबरथ एक्सप्रेसने नागपुरात येत होता.

सर्वसाधारण डब्यातून तो प्रवास करीत होता प्रवाशांनी हा डबा गच्च भरला होता. शेख अकबर प्रवेशद्वाराजळ उभा होता. त्याचा धक्का शेजारी उभ्या एका युवकाला लागला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. तो वाद वाढला आणि त्यांचे भांडणात रुपांतर झाले. शेख अकबर यास प्रवेशद्वारातून फेकून देण्यात आले.

हेही वाचा : नागपूर : फेसबुकवरील तरूणीसोबतचा व्हीडिओ कॉल डॉक्टरला भोवला ;

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी गाडी बुटीबोरीजवळ होती. दोन गटातील भांडणात कोणीही हस्तक्षेप केली नाही. तसेच युवक रेल्वेगाडी फेकला गेलातरी कोणीही साखळी खेचून गाडी थांबवली नाही. रेल्वेगाडी अजनी येथे पोहोचल्यानंतर शेख अबकर यांच्या मित्रांनी लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार केली. दोन युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.