फेसबुकवरून मैत्री करणाऱ्या तरूणीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालययातील (मेडिकल) एका डॉक्टरला व्हिडिओ कॉलींग करून तो व्हीडिओ समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देत पावणे दोन लाख रुपये उकळले. या प्रकरणी अजनी पोलिसांनी पायल जोशी नामक तरूणीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरला १४ ऑगस्टला डॉक्टरला पायल जोशी नावाच्या एका तरूणीची फेसबुवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्याने स्वीकारली. दोन ते तीन दिवस दोघांमध्ये फेसबुकवर चँटिंग झाले. त्यानंतर दोघांनी परस्परांना मोबाईल क्रमांक दिले. २० ऑगस्टला मध्यरात्रीच्या सुमारास पायलने डॉक्टर ला मँसेज केला आणि अश्लील चँटिंग केली. मध्यरात्रीनंतर पायलने व्हिडिओ कॉल केला.

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
Rohit sharma speech in Mumbai Indians Dressing Room Video MI vs DC
IPL 2024: ‘वैयक्तिक कामगिरी, विक्रम फारसे महत्त्वाचे नाहीत…’, रोहित शर्माने मुंबईच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी साधला संवाद
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी

हेही वाचा : राज्यातील पहिले अपंगांसाठीचे विशेष उद्यान नागपुरात

दुसऱ्या दिवशी पायलने डॉक्टरला फोन घेण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. त्याबदल्यात रात्री पुन्हा व्हिडिओ चँटिंग करण्याचे तिने आमिष दाखवले. डॉक्टरने लगेच तिच्या बँक खात्यात १० हजार रुपये टाकले. त्यामुळे जाळ्यात शिकार अडकल्याची पायलची खात्री झाली. मध्यरात्री पुन्हा डॉक्टर आणि पायलने अश्लील व्हिडिओ कॉलींग केले. पायलने तो व्हिडिओ रेकॉर्ड केला.

दुसऱ्या दिवशी डॉक्टरच्या मोबाईलवर तो अश्लील व्हिडिओ टाकला. त्याने पायलला फोन करून या प्रकाराबद्दल विचारणा केली. तिने व्हिडिओ डिलिट करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. बदनामीच्या भीतीपोटी डॉक्टरने लगेच पैसे तिच्या खात्यात टाकले. तासाभरात पायलने पुन्हा फोन करून एक लाख रुपयांची मागणी केली. डॉक्टरने तिला नकार दिला. तिने अश्लील व्हिडिओ कुटुंबियांना आणि मेडिकलच्या अन्य डॉक्टरांना पाठविण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या डॉक्टरने तिला लगेच १ लाख रुपये खात्यात जमा केले.

हेही वाचा : दोन वर्षांच्या खंडानंतर उद्या नागपुरात निघणार प्रसिद्ध काळी व पिवळी मारबत

पोलिसात तक्रार करण्याची धमकी

तोतया पायल जोशीने डॉक्टरला फोन करून पोलिसात तक्रार करणार असल्याची धमकी दिली. पोलिसांनी अटक केल्यानंतर बदनामी आणि नोकरी जाण्याची भीती असल्यामुळे डॉक्टर घाबरला. त्याने तिला व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितले. मात्र तिने किमान २५ हजार रुपये देण्यास सांगितले. त्याने एका मित्राकडून २५ हजार रुपये घेऊन पायलच्या खात्यात टाकले. तरीही तिने अश्लील व्हिडिओ एका मित्राला पाठवून आणखी २ लाखाची मागणी केली.

हेही वाचा : ‘सेक्स्टॉर्शन’ गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ; राज्यात मुंबई प्रथम तर नागपूर, पुणे दुसऱ्या स्थानावर

अखेर गुन्हा दाखल

पायलची पैशाची मागणी वाढल्यानंतर डॉक्टर घाबरला आणि तणावात राहायला लागला. त्याने एका डॉक्टर मित्राला एक लाख रुपयांची मागणी केली. त्याने देण्याची तयारी दर्शविली, मात्र कारण विचारले. त्याने मित्राला घडलेला प्रकार सांगितला. त्याने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे डॉक्टरने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून पायल जोशी नाव धारण केलेल्या तरुणीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.