अकोला : रेल्वेद्वारे मूर्तिजापूर स्थानकादरम्यान घेण्यात येत असलेल्या ‘ब्लॉक’मुळे रद्द करण्यात आलेल्या काही मेल व एक्सप्रेस पूर्ववत करण्यात आल्या आहेत, तर एक गाडी ‘शॉर्ट टर्मिनेट’ करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – धक्कादायक! संरक्षण दलाच्या जमिनींवर भूमाफियांचे अतिक्रमण; अधिकार्‍यांशी संगनमत अन् सीमांकनाबाबतची अस्पष्टता कारणीभूत

हेही वाचा – श्रावणात वधारले केळीचे भाव; भाविकांना भुर्दंड, दर चढेच राहण्याची चिन्हे

१२११२ अमरावती-मुंबई एक्सप्रेस, १२१११ मुंबई-अमरावती एक्सप्रेस, १२१३६ नागपूर-पुणे एक्सप्रेस या गाड्या ३० ऑगस्टला आपल्या सुरू होणाऱ्या प्रवासापासून नियोजित वेळत सुटेल. १२१३५ पुणे-नागपूर एक्सप्रेस ३१ ऑगस्ट रोजी आपल्या नियोजित वेळेत सुटणार आहे. १७६४१ काचीगुडा-नरखेड एक्सप्रेस ३० ऑगस्टला अकोला रेल्वेस्थानक येथे ‘शॉर्ट टर्मिनेट’ करण्यात आली आहे. १७६४२ नरखेड-काचीगुडा एक्सप्रेस ३१ ऑगस्ट रोजी अकोला स्थानकावरूनच प्रस्थान करेल. नरखेड ते अकोला दरम्यान ही गाडी रद्द राहील. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These trains canceled due to the block will run ppd 88 ssb
First published on: 30-08-2023 at 16:54 IST