लोकसत्ता टीम

वर्धा : हिंगणघाट शहरात चोरट्यांनी हैदोस घातला असून नागरिक चांगलेच त्रस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच येथील आमदार समीर कुणावार यांच्या बंगल्यावरही चोरट्यांची नजर गेली.

आणखी वाचा-प्रशासकीय राजवटीतही प्रश्‍न कायमच! मुलभूत नागरी सुविधांचा बोजवारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्यरात्री ते चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरण्याच्या प्रयत्नात होते. तेव्हाच चौकीदार वासुदेव भजभुजे यांची नजर चोरट्यांवर पडली. त्यांनी हटकल्यावर चोरटे पसार झाले. समीर कुणावारांकडून पोलिसांकडे तक्रार झाल्यावर काही अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे एकच दिवसापूर्वी पोलीसांनी चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीस अटक केली आहे. आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथील तिघांना अटक करून चोरीचा माल जप्त करण्यात आला. पण भय संपता संपत नाही.