अमरावती : भीष्मक राजा यांची कन्या रुक्मिणी अमरावती येथील अंबादेवीच्या दर्शनासाठी आल्या असताना भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे हरण केले, अशी आख्यायिका आहे. पण या मंदिरासोबतच स्थानिक माताखिडकी परिसरातील पुरातन श्रीकृष्ण मंदिराचेही नाते आहे. या मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

राजस्थानी शैलीत धौलपुरी गुलाबी दगडांमध्‍ये श्रीकृष्ण मंदिराची उभारणी करण्‍यात आली आहे. जन्‍माष्‍टमीला महाराष्ट्रासह देशाच्‍या विविध भागांतून आलेल्‍या भाविकांची दर्शनासाठी रीघ लागते.

हेही वाचा – ‘लोकसंवाद’ यात्रेला चंद्रपुरात अल्प प्रतिसाद! कारण काय, जाणून घ्या…

हेही वाचा – ग्रामस्थ खवळले अन् काँग्रेस आमदाराला आल्यापावली परतवून लावले; श्रेय लाटण्यासाठी अर्धवट बांधकामाच्या लोकार्पणाचा घाट, गावकऱ्यांत रोष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आख्‍यायिकेनुसार, कौंडण्यपूर माहेर असलेल्या रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी निश्चित झाला होता. परंतु रुक्मिणीला त्याच्‍याशी विवाह करावयाचा नव्हता. तिने मनोमन भगवान श्रीकृष्णाशी विवाह करण्याचे ठरविले होते. तिकडे श्रीकृष्णानेदेखील रुक्मिणीच्‍या निस्सीम प्रेमामुळे तिच्‍याशीच विवाह करण्याचा निश्चय केला होता. रुक्मिणीने आपला विचार एका पत्रात लिहून श्रीकृष्णास प्रार्थनापूर्वक कळविला. शिशुपालाशी ठरलेल्या विवाहाच्‍या एक दिवस आधी कुळाच्‍या परंपरेनुसार नियोजित वधू म्हणून जेव्हा मी अंबादेवीच्‍या दर्शनास जाईल तेव्हा आपण मला घेऊन जावे, असा प्रस्ताव रुक्मिणीने त्या पत्रात ठेवला होता. माताखिडकी (बुधवारा) येथील मंदिरात भगवान श्रीकृष्णाचा तीन दिवस मुक्काम होता. ठरल्यानुसार रुक्मिणी अंबादेवीच्या दर्शनास आली तेव्हा तेथून तिचे श्रीकृष्णांनी हरण केले. श्रीकृष्णांचा त्यावेळी याच ठिकाणी मुक्काम झाल्यामुळे हे मंदीर श्रीकृष्ण चरणांकित आहे. नेहमीच भाविकांची येथे गर्दी असते. जन्माष्टमीला जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.