नागपूर : रोखठोक वक्तव्य आणि पक्षापलीकडे जाऊन मदत करणारे केंद्रीय मंत्री अशी नितीन गडकरी यांची ओळख आहे. मात्र, त्यांचे घर बाॅम्बने उडवण्याची धमकी रविवारी सकाळी देण्यात आली. सकाळी ९ वाजता आलेल्या धमकीच्या फोनमुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.पोलिसांनी लगेच गडकरी यांचे महाल आणि वर्धा मार्गावरील घर गाठत तपासणी केली.
मात्र त्यात काहीच आक्षेपार्ह आढळले नाही.उमेश राऊत असे धमकी देणाऱ्या अटकेतीक आरोपीच नाव आहे. उमेश हा कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत भाड्याने राहतो. त्याच्यासोबत त्याचा मित्र रूम पार्टनर म्हणून राहतो.हे दोघेही मेडिकल चौकातील एका देशी दारूच्या भट्टीवर काम करतात. मात्र माझा फोन मित्राने घेतला होता. त्याने कोणाला कॉल लावला याची माहिती नसल्याचे उमेश राऊत याचे म्हणणे आहे.नितीन गडकरींचे घर बॅाम्बने उडवण्याची धमकी देण्यामागे त्याचा काय उद्देश होता याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
पोलिसांचे म्हणणे काय?
११२ क्रमांकावर धमकी देणारा काॅल येताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सुरक्षा पथकाला तातडीने माहिती देण्यात आली. श्वान पथक आणि सुरक्षा यंत्रणांना गडकरींच्या निवासस्थानी पाठवण्यात आले. सुदैवाने यात काही आढळले नाही, असे परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी यांनी सांगितले.