नागपूर : नागपूरसह महाराष्ट्रात सरकारची लॉटरी लोकप्रिय होत आहे. त्यामागे कारणही तसेच आहे. अवघ्या काही महिन्यांतच नागपुरातील तिघे केवळ ६ रुपयांत कोट्यधीश झाले आहेत. संपूर्ण राज्यात मागील ६ वर्षांत १००, तर देशभरात २४०० लॉटरी शौकीन कोट्यधीश झाल्याने लॉटरीची लोकप्रियता सतत वाढत आहे. दररोज ६ रुपयांत करोडपती होण्याची संधी दिवसभरात तीन वेळा मिळत असल्याने आजघडीला लाखोंच्या संख्येने लॉटरीशौकीन हा खेळ खेळत आहेत.

नागपूरात ३ प्रमुख एजंट आणि ३० किरकोळ विक्रेते लॉटरी विक्री करतात. जवळपास एक लाख शौकीन दररोज आपले नशीब आजमावतात. एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान नागपुरातील तीन विजेत्यांना एक कोटींची लॉटरी लागली आहे. एका सर्वेक्षणानुसार नागालॅण्ड व पश्चिम बंगाल राज्यांत लॉटरी खरेदीत महिलादेखील आघाडीवर असून, तेथे लॉटरी विक्रीचे प्रमाण सर्वाधिक आहे. लॉटरी विक्रीतून शासनाला मोठ्या प्रमाणात जीएसटी मिळत असल्याने विविध सण-उत्सवानिमित कोटींची बक्षीसं जाहीर करून लॉटरीची विक्री केली जात असल्याची माहिती बालाजी लॉटरीचे संचालक हरीश कश्यम यांनी दिली.

हेही वाचा – शेतकऱ्यांची वाट बिकट! मातोश्री पांदन रस्ते योजना कागदावरच; ७१ पांदन रस्ते मंजूर केवळ ४ रस्त्यांची कामे सुरु, ९ कामे रद्द

हेही वाचा – चंद्रपुरात पाऊस, इरई धरणाची दोन दारे उघडली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंत नागपूर शहरात केवळ महाराष्ट्र लॉटरीची विक्री दिवाळी दसरा व संक्रांत व इतर सणाच्या वेळी मोठ्या प्रमाणात व्हायची. परंतु आता लॉटरीने अनेकांना मोहिनी घातली आहे. महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वर्षभरात ७ बंपर ड्रॉ काढले जातात, अशीही माहिती आहे.