लोकसत्ता प्रतिनिधी
नागपूर : येत्या एक व दोन डिसेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा नागपूर दौरा आहे. त्यामुळे शहरात जवळपास ४ हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी स्वत: राष्ट्रपतींच्या दौऱ्यांचे मार्गाचे निरीक्षण करीत कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला आहे. तसेच वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी रस्त्यावरील वाहतुकीत बदल केले आहेत.
उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्थेसह वाहतूक व्यवस्थाही बिघडलेली आहे. १ व २ डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा नागपूर दौरा असल्यामुळे पोलिसांसमोर वाहतूकीचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान आहे. सध्या शहरात खासदार महोत्सव आणि अन्य धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. त्यात राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस उपायुक्तांची बैठक घेऊन सुरक्षेबाबत आढावा घेतला. राष्ट्रपतींच्या दौऱ्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर उभ्या असलेल्या वाहनांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. त्यामुळे काही रस्त्यांवरील वाहतूक दुसऱ्या रस्त्याकडे वळती केली आहे. काही ठिकाणी रस्ता दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे जर अजनी, मेडिकल चौक, धंतोली किंवा रहाटे कॉलनी चौकासह काही विशिष्ट मार्गांवरून वाह त्यामुळे दोन दिवस रहाटे कॉलनी, मेडिकल चौक, तुकडोजी महाराज चौकासह चार मार्ग ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात आले आहेत.
आणखी वाचा-६० कोटी खर्चून तयार होणार जिल्हा न्यायालयाची नवीन विस्तारीत इमारत; विधी क्षेत्रात आनंदाचे वातावरण
यासंदर्भात वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त चेतना तिडके यांनी अधिसूचना जारी केली आहे. १ व २ डिसेंबर रोजी राष्ट्रपती यांच्यासोबतच राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेतेदेखील शहरात राहणार आहेत. त्यामुळे वर्धा मार्ग, धंतोली, रहाटे कॉलनी, सिव्हील लाईन्स, रेशीमबाग चौक, मेडिकल चौक, तुकडोजी चौक इत्यादी मार्गांवर वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात ठेवून चार मार्गांवर ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात आला आहे. शहरात राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे शहरातील काही ठिकाणच्या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. बॉम्बशोधक-नाशक पथक, अतिदक्षता पथक, गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहे.