नागपूर: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठे बदल बघायला मिळत आहे. सोन्याचे दर बघून ग्राहकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. नागपुरातील सोन्याच्या दराबाबत आपण जाणून घेऊ या.

सनासुदीच्या काळात सोन्याच्या खरेदीकडे नागपूरसह देशभरातील ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे या काळात सगळ्याच सराफा दुकानात ग्राहकांची गर्दी असते. नवरात्रीमध्येही सोने- चांदीच्या देवी- देवतांच्या मुर्तींसह दागिने खरेदी करणाऱ्यांची कमी नाही. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (२२ सप्टेंबर २०२५ रोजी) सोन्याचे दर सकाळी १० वाजता सराफा बाजार उघडल्यावर प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी १ लाख ११ हजार २०० रुपये, २२ कॅरटसाठी १ लाख ३ हजार ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ८६ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ७२ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. परंतु त्यानंतर सोन्याच्या दरात प्रत्येक तासात बदल बघायला मिळत आहे.

दरम्यान सराफा बाजारात सोमवारी दुपारी ४ वाजता सोन्याचे दर प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी १ लाख १२ हजार ३०० रुपये, २२ कॅरटसाठी १ लाख ४ हजार ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ८७ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ७३ हजार रुपये नोंदवले गेले. त्यामुळे सोमवारी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी नागपुरात सकाळी १० वाताच्या तुलनेत दुपारी ४ वाजता सोन्याच्या दरात मोठे बदल झाले.

त्यानुसार सोन्याच्या दरात प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी १ हजार १०० रुपये, २२ कॅरटसाठी १ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी १ हजार ७०० रुपये दर वाढल्याचे दिसत आहे. सहा तासातच दर वाढल्याने पुढे काही तासात आणखी दर वाढण्याचे सराफा व्यवसायिकांकडे संकेत असल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. सराफा व्यवसायिकांकडून मात्र येत्या काही काळात आंतराष्ट्रिय घडामोडी बघता आणखी दर वाढण्याचे संकेत दिले जात आहे.

चांदीच्या दरातही…

नागपुरातील सराफा बाजारात चांदीच्या दरातही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मोठे बदल बघायला मिळत आहे. शहरातील बाजार उघडल्यावर सकाळी दहा वाजता नागपुरात चांदीचे दर प्रति किलो १ लाख ३३ हजार ७०० रुपये होते. हे दर सहा तासानंतर दुपारी ४ वाजता १ लाख ३३ हजार रुपये नोंदवले गेले. त्यामुळे सकाळी १० वाजताच्या तुलनेत दुपारी ४ वाजता चांदीच्या दरात ७०० रुपयांची वाढ झालेली दिसत आहे.