वर्धा : विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मोठमोठे नेते मैदानात उतरले आहेत. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, काँग्रेसच्या प्रियांका गांधी व अन्य विदर्भ दौऱ्यावर आहेत. या प्रचार सभा सामान्य जनतेसाठी असतात पण व्हिआयपी सेक्युरिटी हा त्यात सर्वात महत्वाचा भाग असतो. झेड प्लस सुरक्षा असणारे नेते दौऱ्यावर असतात तेव्हा विविध पातळीवार सुरक्षा यंत्रणा कार्यरत होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे १७ नोव्हेंबर रविवारला वर्ध्यात येत आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा असल्याने सुरक्षा अधिकारी आज सकाळी वर्ध्यात दखल झाले.

जिल्हा पोलीस अधीक्षकांशी त्यांनी बंदद्वार चर्चा केली. स्थानिक पोलीस हेच महत्वाची जबाबदारी सांभाळणार असल्याने त्यांना अधीक्षकांनी मार्गदर्शन केले. केंद्रीय राखीव पोलीस दल तसेच गृह मंत्रालय यांनी आखून दिलेल्या चौकटीत दौरा संयोजन होणार. तशी बैठक नुकतीच संपन्न झाली असल्याचे या बैठकीत सहभागी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नमूद केले. गृहमंत्री शहा यांना एसपीजी सुरक्षा नाही. ती केवळ पंतप्रधान यांनाच असते. म्हणून शहा यांच्याच हेलिकाप्टर मध्येच दोन सुरक्षारक्षक असणार आहे. ते ईथे आल्यावर पूर्वीच उपस्थित सुरक्षा अधिकारी वर्ग त्यांना सर्व त्या खबरदारी बाबत अवगत करतील. ताज्या काही घडामोडीनुसार नक्षली अनुषंगाने नजर तैनात केल्या जाणार आहे.

हेही वाचा…VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच आतंकवादी व सध्या एका देशात सूरू कारवाई वरून सुरक्षा वाढणार. नेहमीचीच सुरक्षा पण दक्षता अधिक म्हणून शहरातील सर्व हॉटेल्स, धर्मशाला, विविध सार्वजनिक निवास्थाने यांचा धांडोळा सूरू झाला. गृहमंत्री शहा यांच्यासोबत स्टेजवर कोण बसणार यांची यादी पूर्वीच केंद्रीय गृह मंत्रालयास गेली आहे. मात्र जिल्ह्यातील भाजपचे चारही उमेदवार उपस्थित राहणार हे निश्चित. अन्य कोण हे माहित नसल्याचे भाजप उमेदवार डॉ. पंकज भोयर यांनी नमूद करीत शहा यांच्या दौऱ्याबाबत अधिक भाष्य शक्य नसल्याचे ते म्हणाले. स्वावलंबी मैदानावर दुपारी एक वाजता शहा यांची प्रचार सभा रविवारी होत आहे. त्यासाठी सुरक्षा कवच किती स्तरीय कशी राहणार, यांची तालीम पार पडल्याचे सांगण्यात आले. गृहमंत्री शहा यांचे आदरातिथ्य कसे यावर कोणी बोलायला तयार नाही. जेवण किंवा नाश्ता करणार की तसेच परत जाणार, हे कुणी आज सांगायला तयार नाहीत. मात्र गृहमंत्री शहा हे कधीच चहा घेत नाही. म्हणून त्यांना त्यांची आवडती ब्लॅक कॉफी ऑफर केल्या जाण्याची शक्यता एकाने व्यक्त केली.