चंद्रपूर : भारतातून खग्रास चंद्रग्रहण ७ सप्टेंबरला दिसणार असून खगोल आणि विज्ञान अभ्यासकांना हे ब्लड मून,रेड मून पाहण्याची चांगली संधी मिळणार आहे. रात्री ९.२७ मिनिटांनी खंडग्रास ग्रहणाला सुरवात होऊन १२.२२ वाजेपर्यंत ते पाहता येईल अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुप चे अध्यक्ष प्रा सुरेश चोपने ह्यांनी दिली आहे.

यंदाच्या वर्षी फारसे ग्रहण भारतातून दिसले नाही. त्यामुळे हेच खग्रास चंद्र ग्रहण चांगल्या पद्धतीने पाहण्याची संधी मिळणार आहे. हे ग्रहण एकूण ५ तास २७ मिनिटे दिसणार आहे,त्यात छायाकल्प चंद्रग्रहनाची सुरवात रात्री ९ वाजता होईल.

खंडग्रास ग्रहणाची सुरुवात 9.57 वाजता होईल तर खग्रास ग्रहण रात्री ११ वाजता सुरू होईल आणि ते रात्री १२.२२. वाजेपर्यंत दिसेल.ह्याच दरम्यान चंद्र लाल रंगाचा दिसेल म्हणून त्याला ब्लड मून, रेड मुन असे म्हटल्या जाते. खग्रास स्थिती ही २ तास ७ मिनिटांची असेल. आकाशात ढगाळ हवामान नसेल तर त्या ठिकाणी खूप सुंदर ग्रहण पाहता येईल. कुठलीही अंधश्रद्धा न बाळगता ग्रहणाचा खगोलीय आणि वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण आणि अभ्यास करावा असे आवाहन सुद्धा प्रा सुरेश चोपणे ह्यांनी केले आहे.

२१ सप्टेंबरला शेवटचे सूर्यग्रहण

२१ सप्टेंबर ला ह्या वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण दिसणार आहे,परंतु ते भारतातून दिसणार नाही. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक, अटाटिक आणि न्यूझीलंड ह्या देशातील काही भागातूनच ही सूर्यग्रहण पाहता येणार आहे अशी माहिती स्काय वॉच ग्रुप तर्फे देण्यात आली आहे.