स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आदिवासी युवकाची नक्षल्यांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या केली. साईनाथ नरोटे (२६) असे मृत युवकाचे नाव असून तो भामरागड तालुक्यातील मर्दहुर या नक्षलग्रस्त गावातील रहिवासी होता. मर्दिनटोला चकमकीनंतर नक्षल चळवळ खिळखिळी झाली होती. मात्र, काही महिन्यांपासून दक्षिण गडचिरोली भागात पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाले असून त्यांनी पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून साईनाथची हत्या केली.

हेही वाचा >>> नागपूर : पुनर्मिलनाचा भावपूर्ण क्षण!…अन् मादी बिबटने बछड्याला घेतले घट्ट कवेत

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
pune, fergusson college, holi, boy, throwing water, balloons, pedestrians, arrested, police,
होळीच्या दिवशी रस्त्यावर फुगे मारणारी हुल्लडबाज मुले ताब्यात; पोलिसांकडून पालकांवर गुन्हे

होळीनिमित्त साईनाथ आपल्या गावी आला होता. गुरुवारी रात्रीच्या सुमारास काही सशस्त्र नक्षल्यांनी गावात येऊन साईनाथची गोळ्या झाडून हत्या केली. साईनाथ हा उच्चशिक्षित असून गडचिरोली येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. अधिकारी बनण्याचे स्वप्न अधुरे साईनाथ हा अभ्यासात हुशार होता. काही काळ गावात तयारी केल्यानंतर तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी गडचिरोलीत आला.  स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून अधिकारी बनण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र, नक्षल्यांनी त्याची पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली.