लोकसत्ता टीम

वर्धा : येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन अभिमत विद्यापीठात झालेली आत्महत्या शैक्षणिक वर्तुळास विचारात पाडणारी ठरत आहे. जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी असणाऱ्या नागपूरच्या पूजा हिने गुरुवारी दुपारी महाविद्यालयच्या चौथ्या माळ्या वरून उडी घेत जीवनाचा वेदनादायी अंत केला. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली.

विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करीत रात्री गाऱ्हाने मांडले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी मिळून कॅण्डल मार्च काढत पूजा प्रती शोक संवेदना व्यक्त केल्या. घटना घडताच पूजा हिची जखमी अवस्थेतील स्थिती पाहणारा संस्थेचा वाहनचालक अनिल ढेंगरे यांच्या तोंडी व रुग्णालयाच्या लेखी तक्रारी नंतर सावंगी पोलिसांनी आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल करीत प्रकरण चौकशी साठी ठेवले आहे.

आणखी वाचा-महिला अधिकाऱ्यांच्या हाती राज्याची कमान; कोण आहेत या आयएफएस, आयएएस आणि आयपीएस अधिकारी?

या प्रकरणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपला रोष व्यक्त केला. अतिरेकी शिस्त व शैक्षणिक ताण असा तक्रारीचा सूर दिसून आला. कुलगुरू डॉ. ललित वाघमारे यांनी सर्व बाजूचा आढावा घेण्यासाठी चौकशी समिती नेमल्याचे स्पष्ट केले. तर या संस्थेचे एक पालक म्हणून ओळख असणारे प्र-कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी घटना अत्यंत दुःखद व विचारात पाडणारी असल्याचे नमूद केले. कोणतीही संस्था ठराविक नियमाने चालविल्या जात असते. अर्थात सुधारणेस नेहमीच वाव असतो. मग ती कोणतीही व्यवस्था असो. मेघे अभिमत विद्यापीठ हे अकॅडमीक व रुग्णसेवा यात अव्वल असावे यासाठी सर्व धडपड करतात. मेडिकल कौन्सिलचे सर्व निकष मग तो ७५ टक्के अनिवार्य उपस्थितीचा असो की नियमित सराव परीक्षा असो, पाळल्या जातात. पण तरी विद्यार्थी या प्रणालीवर नाराज असतील तर निश्चित फेरविचार करण्यास जागा आहे. ते आम्ही सर्व बसून ठरवू. विद्यापीठ प्रशासन नियमाने चालते. त्यात आमची ढवळाढवल नसते. पण प्रशासनात पण अग्रेशन नको.

आणखी वाचा-महिला अधिकाऱ्यांच्या हाती राज्याची कमान; कोण आहेत या आयएफएस, आयएएस आणि आयपीएस अधिकारी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थी हा सर्वोच्च. त्याचे पावित्र्य कोणत्याही शैक्षणिक संस्थेत जपल्या जायलाच हवे. पण घटनेच्या अनुषंगाने व्यवस्थेकडे बघायला नको. तुमचं पोर, माझं पोर असो, जीव प्रत्येकालाच प्रिय असतो. असे घडायला नको. पण आम्ही आढावा घेणार. कुठेही उणीवा दिसून आल्या तर त्या त्वरित दूर केल्या जातील. विद्यार्थी हित व त्यांची शैक्षणिक भरारी हेच सर्वोच्च ध्येय असल्याचे डॉ. मिश्रा ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले.