नागपूर : शहरातील अपघातांना आळा बसावा, वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी यासाठी पोलीस जनजागृतीऐवजी थेट दंडात्मक कारवाई आणि ‘चिरीमिरी’वर भर देत आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या घटण्याऐवजी वाढत असल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात १६ लाखांवर वाहने असून वाहनांच्या गर्दीमुळे रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते. शहरात दररोज किरकोळ अपघात घडत असतात. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन होत नसल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. शहरातील मुख्य चौकात वाहतूक पोलीस वाहतुकीच्या नियंत्रणासाठी तैनात केले जातात. मात्र, वचक नसल्यामुळे वाहतूक पोलिसांसमोरच ‘ट्रिपल सीट’ तसेच वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही वाहने चालविणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

हेही वाचा – बुलढाणा : सावकारी जाचाने विवाहितेची आत्महत्या; त्रास असह्य झाल्याने उचलले टोकाचे पाऊल

वाहतूक पोलीस चौकात उभे न राहता दुसऱ्या चौकातील दोन-तीन सहकारी कर्मचाऱ्यांशी मिळून सिग्नलच्या कोपऱ्यात उभे राहून ‘वसुली’चा सपाटा सुरू करतात. त्यामुळे अनेक वाहनचालकांना शे-दोनशे दिल्यास पोलीस कारवाई करीत नाहीत, अशी खात्री झाल्यामुळे वाहतूक नियम पाळणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. अनेकदा वरिष्ठ पोलीस निरीक्षकसुद्धा ‘डिव्हाईस मशिन’ वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांना चालान करण्याचे लक्ष्य देतात. त्यामुळे अनेक कर्मचारी वाहतूक नियम मोडल्यानंतर ‘चिरीमिरी’ मागतात, न दिल्यास थेट चालान कारवाई करीत आपले लक्ष्य पूर्ण करतात. वाहतुकीचे इतर नियमही सर्रास धाब्यावर बसविले जात आहेत.

वाहतुकीचे नियम मोडण्यात तरुण आघाडीवर

विनागिअरच्या दुचाकींची संख्या जास्त आहे. चालवायला सोपी आणि एक हात मोकळा राहात असल्याने या ‘स्कुटरेट’ प्रकारातील मोपेड चालविणारे सर्रास भ्रमणध्वनीवर बोलत जाताना रस्त्यावर दिसून येतात. त्याचवेळी ‘ट्रिपल सीट’ जाणारेही स्वतः वाहतुकीचे नियम मोडत असतात. त्याचबरोबर सिग्नल न पाळणे, उलट्या दिशेने जाणे असे प्रकार तरुणांकडून होताना दिसत असतात.

कारवाई करताना वादावादी

वाहतूक पोलिसांकडून अशा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाते. मात्र, वाहतूक पोलिसांच्या कारवाईलाही मर्यादा आहेत. अनेकदा अशा वाहनचालकांवर कारवाई करताना वादावादीचे प्रसंग घडत असतात. शहरात जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत ७४ हजार ७१५ वाहनचालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्यामुळे कारवाई करण्यात आली. तसेच २२ हजार ११९ वाहनचालकांवर ‘ट्रिपल सीट’ दुचाकी चालविल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

हेही वाचा – विक्रांत अग्रवालने ७७ कोटी रुपये आणले कुठून? फिर्यादीही येणार चौकशीच्या फेऱ्यात

‘ट्रिपल सीट’ वाहन चालविणे गुन्हा आहे. यामुळे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवालाही धोका होऊ शकतो. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे, अन्यथा वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. – विनोद चौधरी, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Triple seat traffic in nagpur city the word of the traffic police is over need for public awareness about the rules adk 83 ssb
First published on: 29-10-2023 at 13:54 IST