बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका कायम आहे. आज शनिवारी झालेल्या अपघातात एक प्रवासी ठार तर दोघेजण जखमी झाले असून त्यांना जालना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अपघातग्रस्त नागपूर येथील रहिवासी आहेत. जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.मुंबई कॉरिडोर वरील चॅनेल क्रमाक ३३६ नजीक आज हा अपघात झाला.

सुजोग सोनी ( वय २० वर्षे, राहणार नागपूर ) असे मृताचे नाव असून आयुष जैन (वय २० वर्षे राहणार नागपूर) हा गंभीर जखमी तर श्रव मेलानी वय (२१वर्षे राहणार नागपूर) हा किरकोळ जखमी झाला आहे .पोलीस उप निरीक्षक शैलेश पवार, पोलीस हवालदार दिनकर राठोड, जमादार सानप हे दुसरबीड उपकेंद्रचे कर्मचारी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा…सेलिब्रिटींपासून सरपंचांपर्यत सर्वच, असूरक्षित, परिस्थिती हाताबाहेर -पटोले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार (एमपी २८ सीबी ९५३०) चालक श्रव मेलानी याला डुलकी लागल्याने अतिवेगात असणारी कार ही समोर चालत असलेल्या मालमोटर ( एमच १२ ३४३३) ला मागून जोरात धडकून उजव्या बाजूचे ‘क्रॅश बॅरियर’ वर धडकली. अपघातात संजोग सोनी हा जागेवरच ठार झाला तर आयुष जैन हा गंभीर जखमी झाला. चालक मेलानी यास किरकोळ दुखापत झाली. ट्रक चालक वैभव रावसाहेब व्यवहारे (राहणार कवडी वपर लोणी काळभोर हा घटनास्थळावरून पळून गेला. सिंदखेड राजा पोलीस पुढील तपास करीत आहे. कार चालकाने दिलेली धडक इतकी भीषण होती की वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. मात्र आश्चर्य म्हणजे कार चालक किरकोळ जखमी झाला असून सोबतचा एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.