लोकसत्ता टीम

चंद्रपूर : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाशात दोन महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहे. २७-२८ ऑगस्टला अवकाशात सुंदर दिसणारा शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ येत असून तो मोठा आणि तेजस्वी दिसणार आहे, तर ३१ ऑगस्ट रोजी रात्रीची पौर्णिमा ही ‘सुपरमून’ आणि ‘ब्ल्यू मून’ पौर्णिमा असेल. या रात्रीसुद्धा चंद्र मोठा आणि जास्त प्रकाशमान दिसणार आहे.

The accused in the case of kidnapping and murder of a 12 year old boy from Wadala was arrested Mumbai news
वडाळ्यातील १२ वर्षांच्या मुलाच्या अपहरण व हत्याप्रकरणातील आरोपीला अटक
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Gold Silver Price
Gold-Silver Price: सणासुदीच्या दिवसांत घसरणीनंतर सोन्याच्या किमतीत वाढ, जाणून घ्या १० ग्रॅमची किंमत
Maharashtra weather update
Nagpur Rain News: रक्षाबंधनावर पावसाचं सावट! हवामान खातं काय म्हणतंय जाणून घ्या…
Gold import decline due to CAD
सोने आयातीत घट; चार महिन्यांत ४.२३ टक्क्यांनी घसरून १२.६४ अब्ज डॉलरवर
rain, Mumbai, rain update mumbai,
मुंबईत पुढील काही दिवस हलक्या सरींची शक्यता
Monsoon Alert Rains will be active again in central India
मान्सून अलर्ट : मध्य भारतात पुन्हा सक्रिय होणार
other side of Gokhale bridge will be started next year
मुंबई : गोखले पुलाची दुसरी बाजू पुढच्या वर्षी सुरू होणार

दरवर्षी ३७८ दिवसानंतर शनी ग्रह पृथ्वीच्या कमी-अधिक जवळ येत असतो. याला अप्पोझिशन असे म्हणतात. म्हणजेच, पृथ्वीच्या एका बाजूला सूर्य तर विरोधी बाजूला शनी असतो. शनी दर २९.५ वर्षांनी सूर्याची एक प्रदक्षिणा करीत असतो, यादरम्यान शनी आणि पृथ्वीच्या अंतरात बदल होत असतो. मागील वर्षी १४ ऑगस्ट तर यावर्षी २७ ऑगस्ट आणि पुढील वर्षी ८ सप्टेंबरला शनी पृथ्वीच्या जवळ असेल. येत्या २७ ऑगस्ट रोजी शनी ग्रह कुंभ राशीत दिसणार असून तो आकाराने मोठा आणि ०.४ प्रतीच्या तेजस्वीतेचा दिसेल. शनीचे त्यावेळेसचे अंतर ८.७६ ॲस्ट्रोनॉमिकल युनिट किंवा १.२ बिल्लीयन कि.मी असेल. शनीला पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज भासत नाही, तो साध्या डोळ्यानेदेखील तेजस्वी दिसतो.

आणखी वाचा-नागपूर: शिवसेना, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीचा आरोप

तसेच दर महिन्याला पौर्णिमा असते तेव्हादेखील चंद्रबिंब मोठे आणि तेजस्वी दिसते. परंतु अशा पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो तेव्हा मात्र चंद्रबिंब आणि प्रकाश सर्वसाधारण पौर्णिमेपेक्षा ७ टक्के तर मायक्रोमूनपेक्षा १४ टक्के जास्त मोठा दिसतो.

चंद्र अंडाकार मार्गाने पृथ्वी प्रदक्षिणा करताना वर्षातून दोन वेळा जवळ येतो. परंतु दरवर्षी ३ ‘सुपरमून’ दिसतात. नियमाप्रमाणे चंद्र-पृथ्वीचे अंतर जेव्हा ३६०,००० किमी पेक्षा कमी असले पाहिजे. या पौर्णिमेला चंद्र-पृथ्वी अंतर ३५७,००० किमी असेल. चंद्र पृथ्वीच्या जवळ असताना पौर्णिमा होते तिला ‘सुपरमून’ असे म्हणतात. परंतु या ऑगस्ट महिन्याप्रमाणे दर दोन वर्षातून एकदा, एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात. (१ आणि ३१ ऑगस्ट) तेव्हा त्या दुसऱ्या पौर्णिमेला ‘ब्लू मून’ असे संबोधतात. पुढील ‘सुपरमून’ हा १८ सप्टेंबर, १७ ऑक्टोबर २०२४ रोजी होईल. ३१ ऑगस्ट रोजी होणारी पौर्णिमा पावसाच्या किंवा ढगाळ हवामानामुळे काही ठिकाणी दिसण्याची शक्यता नसली तरी अनेक ठिकानी ती अल्प किंवा पूर्ण दिसण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-भंडारा : येराली येथील आश्रम शाळेत ४० विद्यार्थ्यांना विषबाधा

पौर्णिमेचा चंद्र दुर्बिणीने चांगला दिसत नाही, त्याला साध्या डोळ्याने पाहणे योग्य असते. या आठवड्यात २७ रोजीचे शनी आणि ३१ रोजीचे चंद्र निरीक्षण अवश्य करावे, असे आवाहन स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.