चंद्रपूर : वाढदिवसाची पार्टी देतो म्हणून दोन शिक्षकांनी अल्पवयीन मुलींला खोलीवर बोलावून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना वरोरा शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंग व पास्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोघेही शिक्षक फरार झाले आहेत. या घटनेमुळे गुरू-शिष्यांच्या नात्याला काळीमा फासला गेला आहे.

हेही वाचा >>> शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, कायदा काय सांगतो?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरोरा येथील लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय वरोरा येथे प्रमोद बेलेकर व धनंजय पारखे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रमोद बेलेकर यांचा वाढदिवस असल्याने अल्पवयीन मुलगी स्टाफ रूममध्ये प्रमोद बेलेकर याला शुभेच्छा देण्याकरिता गेली होती. शुभेच्छा दिल्यानंतर प्रमोद बेलेकर याने संध्याकाळी पार्टी देतो म्हणून धनंजय पारखे या शिक्षकाच्या रूमवर बोलाविले. रूमवर आल्यानंतर धनंजय पारखे व प्रमोद बेलेकर यांनी तिचा विनयभंग केला. याप्रकरणी वरोरा पोलिसात तक्रार देण्यात आली. वरोरा पोलिसांनी प्रमोद बेलेकर व धनंजय पारखे यांच्याविरुद्ध विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोघेही शिक्षक फरार आहेत. वरोरा पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.