नागपूर: उद्धव ठाकरे हे नेहमी शिव्या घालतात, टोमणे मारतात, ते कधी शिव्या घालत नाही हे सांगा. आता त्यांच्याकडे काही विषय नाही. नैराश्यातून ते बोलत आहेत, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.

उदय सामंत नागपूरला आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील बाब आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करतील हा विश्वास मलादेखील आहे.

शिर्डीमध्ये पंतप्रधान दौरा झाला. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांनी जे प्रयत्न केले त्या आजपर्यंतच्या इतिहासात कधीही झालेले नाही. यापूर्वी शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी कोणीही प्रयत्न केलेले नाही असेही सामंत म्हणाले. जरांगे पाटलांना मी स्वतःसुद्धा भेटलो होतो. मराठा आरक्षण हे न्यायालयामध्ये टिकणारे द्यायचे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न के होते, मात्र सरकार बदलल्यावर ते टिकू शकले नाही. हादेखील मराठा आरक्षणाचा इतिहास आहे. त्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात टिकणारे आरक्षण द्यायचे. कुठूनही आडकाठी न येणारे आरक्षण आम्हाला द्यायचे आहे.

हेही वाचा – तापमानात वेगाने घसरण, राज्यात थंडीची चाहूल

हेही वाचा – ‘या’ मागणीसाठी आता कंत्राटी आरोग्य- वीज कर्मचारी आक्रमक

आज यवतमाळ आणि वर्ध्याच्या दौऱ्यावर आहे. एमआयडीसीचा प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने बैठका घेणार आहे. सुनावणीसंदर्भात आम्ही योग्य ते कागदपत्र निवडणूक आयोगाकडे दिले. त्यामुळे धनुष्यबाण एकनाथ शिंदे साहेबांच्या ताब्यात येणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष योग्य तो न्याय देईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.