ज्येष्ठ निरूपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर आता शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत अमित शाहांवर हल्लाबोल केला आहे. सत्तेची मस्ती डोक्यात गेलेला कोणीही असला तरी, सच्चा समाजसेवकासमोर झुकावंच लागते, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

नागपुरात महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. “आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. ही आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. पण, हा पुरस्कार देणारे देशभर घराणेशाहीच्या विरोधात बोंबलत आहे. मात्र, त्यांना एका समाजसेवा करणाऱ्या घरण्याच्यासमोर झुकावं लागलं. सत्तेची मस्ती डोक्यात गेलेला कोणीही असला, तरी समोर सच्चा समाजसेवक असल्यावर झुकावंच लागेल. हे महाराष्ट्राने आज संपूर्ण देशाला दाखवून दिलं आहे.”

हेही वाचा : बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या ‘त्या’ टीकेचा नितीन देशमुखांनी घेतला समाचार; मतीमंद प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख म्हणाले…

“धर्माधिकारी घराण्याची एक परंपरा असून, ते व्यसनमुक्तीचे काम करतात. दारू आणि अंमली पदार्थाचे व्यसन वाईट असते. तसेच, सत्तेची नशा सुद्धा असते. दारूचे व्यसन एक घर उद्ध्वस्त करते. तर, सत्तेची नशा पूर्ण देश उद्ध्वस्त करते, हे आपण भोगत आहोत,” असं टीकास्र उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर केलं आहे.

हेही वाचा : “शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राला सुडाचं राजकारण दिलंय, त्यांनी…”; ‘वज्रमूठ’ सभेतून जयंत पाटलांचा हल्लाबोल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपल्या देशात लोकशाहीचा उपयोग फक्त सत्तेत बसलेल्यांच्या मित्रांचे गिऱ्हाईक आणि मतदार वाढवण्यासाठी केला जातोय. जगाच्या श्रीमंतीत यांच्या मित्रांचे क्रमांक वाढत चालले आहेत. पण, गोरगरीब जनतेचा क्रमांक खाली चालला आहे,” असा घणाघाती उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर केला आहे.