लोकसत्ता टीम

नागपूर: शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याची एकही संधी भाजपने सोडली नाही. कधी केंद्रीय चौकशी यंत्रणांच्या माध्यमातून तर कधी शिंदे गटांच्या माध्यमातून शिवसेना खिळखिळी करण्याचे प्रयत्न भाजपने केले आहेत. मात्र त्यानंतरही उद्धव ठाकरे खंबीरपणे उभे असून येत्या लोकसभा निवडणुकीला तोंड देण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ठाकरे गटाने स्री संवाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून खुद्द रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ती फिरणार आहेत. यात शिवसेनेच्या प्रमुख नेत्या सहभागी होणार आहे.

या यात्रेची सुरुवात विदर्भातून झाली असून ती बुधवारी नागपूर जिल्ह्यात दाखल होत आहे. जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात ही यात्रा फिरणार असून महिलांशी संवाद साधणार आहे.

आणखी वाचा-नागपूर : पतंगांच्या नादात २२ जण रुग्णालयात! नायलॉन मांजाचा वापर सुरूच

रामटेक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथील शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हे शिंदे गटासोबत आहे. त्यामुळे ही जागा उध्दव ठाकरे गटांसाठी महत्वाची आहे. हे लक्षात घेऊन यात्रेसाठी रामटेक श्री निवड करण्यात आली आहे.रश्मी ठाकरे यांच्या सोबत शिवसेनेच्या उपनेत्या विशाखा राऊत, किशोर पेडणेकर,ज्योती ठाकरे,संजना घाडी व अन्य महिला नेत्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्री संवाद यात्रेचा मार्ग

१७ ला – स. १०:३० वा. रामटेक, दु २ वा सावनेर, ४:३० काटोल व रात्री नागपूरला मुक्काम
१८ ला – स. १०:३० हिंगणा,दु २ वा उमरेड, दु ४;३० कामठीला ही यात्रा भेट देणार आहे.