नागपूर : इंजिनिअर होण्याची माझी खूप इच्छा होती, पण अभ्यासात कमी पडलो. इंजिनिअर नाही, पण डॉक्टर झालो. तरीही मी नावासमोर डॉक्टर लावत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात त्यांचा शैक्षणिक प्रवास उलगडताना सुशिक्षित होऊन चालणार नाही, तर सुसंस्कृत व्हा, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

हेही वाचा – वर्धा : सुमित वानखेडे उत्तम नेते असल्याचा आमदार दादाराव केचे यांना साक्षात्कार, म्हणाले ते सर्वांना..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते १९७५ सालचे आणिबाणीचे वर्ष होते. दहावीत मला ५२ टक्के गुण मिळाले आणि सायन्स ग्रुपमध्ये ४९.२२ टक्के. मला इंजिनिअर व्हायचे होते, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मी जयप्रकाशजींच्या आंदोलनात सहभागी झालो. त्याचा परिणाम निकालावर झाला. मी इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमासाठी अपात्र ठरलो. कारण त्यासाठी सायन्स ग्रुपमध्ये ५० टक्क्यांची अट होती. मी पुरता नर्व्हस झालो. इंजिनिअर बनू शकलो नाही, पण मी डॉक्टर नक्की बनलो. मला सहा-सहा डी.लीट मिळाल्या. त्यात पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला, औरंगाबाद विद्यापीठ, राऊळ, नांदेड, उत्तर भारत, तामीळनाडूतील विद्यापिठांनी मला डी.लीट दिल्या. तरीही मी नावापुढे डॉक्टर लावत नाही. एकाने मला विचारले. तेव्हा मी त्याला म्हटले, मला वाटते मी त्या पात्रतेचा नाही, असा किस्सा गडकरी यांनी सांगितला.