वर्धा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांच्यावर अप्रत्यक्ष तोफ डागणारे आर्वीचे आमदार दादाराव केचे यांना वानखेडे यांची महती अखेर पटली आहे.

मला न विचारता निधी कसा दिला, असा सवाल थेट फडणवीस यांना पत्रातून करणाऱ्या केचेंचा रोष वानखेडे यांच्यावर असल्याचे उघड होते. त्यांनी आपले पीएचे काम करावे असाही सल्ला केचे यांनी देत वानखेडे यांची संभाव्य दावेदारी प्रश्र्नंकित केली होती. आता मात्र त्याच केचेंना वानखेडे यांची महती पटली आहे. त्याबाबत एका व्हिडीओतून आपल्या भावना मांडल्या.

हेही वाचा – नागपूर : क्रांतिकारी पद्धतीने नाही, संविधानाला धरून निर्णय घ्या, अतुल लोंढे यांचे विधानसभा अध्यक्षांना आवाहन

ते म्हणतात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी फोन करून मला फडणवीस यांचे ओएसडी वानखेडे यांची नियुक्ती वर्धा लोकसभा क्षेत्राचे प्रभारी म्हणून करीत असल्याची माहिती दिली. वानखेडे यांना प्रशासकीय व्यवस्थेतून मोठा अनुभव आहे. – त्यांच्या आजोबा, वडिलांपासून त्यांना राजकीय भान आहे. म्हणून मी बावनकुळे यांना त्वरित होकार दिला. योग्य नाव सुचविले आहे. त्यांची नियुक्ती आपण केलीच पाहिजे. लोकसभा क्षेत्रातील सहाही विधानसभा मतदारसंघात त्यांचा परिवाराच्या माध्यमातून चांगला संपर्क आहे. त्याचा चांगला फायदा लोकसभा निवडणुकीत पक्षाला होवू शकतो, अशी भावना केचे व्यक्त करतात.

हेही वाचा – नवीन घरात गृहप्रवेशाची इच्छा अपूर्णच.. नागपूर पोलिसाचा मध्यप्रदेशात अपघाती मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केचे यांना थोड्या विलंबाने फडणवीस यांची भेट मिळाली होती. त्यात काय ठरले ते गुपितच आहे. मात्र आता केचे यांचा बदललेला नूर बैठकीतील रहस्य उलगडण्यास पुरेसा ठरावा.