वर्धा : जागतिक अन्न सुरक्षा दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने आकस्मिक तपासणी करीत खाद्य विक्रेत्यांचा धांडोळा घेतला. त्यात काही गाड्यांमध्ये खाण्यास अयोग्य पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच मान्यताप्राप्त नसलेल्या पेयजल बॉटल, फ्रूट ज्यूस जप्त करण्यात आले.

काही समर स्पेशल गाड्यात खाद्य विकणारे अधिकृत नसल्याची धक्कादायक बाब दिसून आली. काही विक्रेत्यांकडे बनावट ओळखपत्रे आढळली. अशांना रेल्वे पोलिसांकडे सोपविण्यात आले. काहींवर कायदेशीर कारवाईची शिफारस झाली. नागपूरच्या दोन विक्रेत्यांकडून जप्त खाद्य नमुने प्रयोगशाळेत तपासनीस पाठविण्यात आले. वर्धा स्थानकात एका अनधिकृत विक्रेत्यास रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रेल प्रबंधक तुषार पांडे, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक नरेश लेखरिया तसेच खाद्य सुरक्षा अधिकारी व अन्य या तपासणीत सहभागी झाले होते.

हेही वाचा – आश्चर्य! एकाच डहाळीला तब्बल दोन डझन आंबे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कांचन केटरॉर्स अँड रेस्टॉरंट विरुद्ध कारवाई प्रस्तावित झाली आहे. सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशा, बैतूल या स्थानकांवरपण तपासणी झाली.