बुलढाणा : सोमवारची रात्र जिल्ह्यासाठी प्रामुख्याने रब्बी पिकांसाठी प्रलयकारी ठरली! जोरदार अवकाळी पावसासह गारपिटीने रब्बी पिके, भाजीपाला व फळबागांचे मोठे नुकसान झाले. निसर्गाच्या या प्रकोपातून मुके जीवसुद्धा वाचले नसल्याचे दुर्देवी वृत्त आहे.

जिल्ह्यातील तेराही तालुक्यांत सोमवारी रात्री उशिरा मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली. यापाठोपाठ ठिकठिकाणी गारांचा वर्षाव झाला. बोराच्या आकारापासून मोठ्या आकाराच्या गारांच्या वर्षावाने पिके, भाजीपाला जमीनदोस्त झाला. सोंगलेल्या पिकांची अतोनात हानी झाली.

हेही वाचा – सेल्फीस नकार देत पालकाने मुख्यमंत्र्यांना केला थेट सवाल; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

चिखली देऊळगाव राजा मार्गावर निसर्गाचे तांडव पहावयास मिळाले. रात्री सव्वानऊच्या सुमारास गारपिटीला सुरुवात झाली. हा तडाखा अनेक मिनिटे सुरू असल्याने मार्गावर व आजूबाजूच्या शेतात गारांचा खच पडला. सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांगरा, दुसरबीड, लोणारमधील बीबी, किनगाव जट्टू, बीबी, गोवर्धन, देवा नगर या गावात असेच चित्र होते. शेगाव तालुक्यातील भोनगाव येथे अर्धातास गारांचे तांडव चालले. परिणामी रब्बी पिके, भाजीपाला, फळबागांचे नुकसान झाले. यामुळे हजारो शेतकरी हवालदिल झाले आहे. शेतातील गहू हरबरा काढणीला आला होता त्याचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.

हेही वाचा – निवृत्त न्यायाधीश २० हजारांत भरणपोषण कसे करणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र शासनाला सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बगळ्यांचे बळी

झाडावर गाढ झोपेत असलेल्या पक्ष्यांनाही गारपीट व अकवाळी पावसाचा फटका बसला. झाडावरून खाली कोसळल्याने अनेक बगळ्यांचा करुण अंत झाला.