लोकसत्ता टीम

वाशीम : वाशीम जिल्ह्यात आज हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला असतानाच मालेगाव तालुक्यात दुपारच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे वाढत्या तापमानातून नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. तर उन्हाळी पिकांनाही या पावसाचा फायदा होणार आहे.

आणखी वाचा-यवतमाळ : रेती घाटावर गोळीबार; वर्चस्वाच्या वादातून टोळीयुद्ध भडकले

अचानक आलेल्या पावसाममुळं काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काढणी करून वाळत घातलेली हळद भिजली असल्याची शक्यता आहे. वाशीम जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून उन्हाच्या पाऱ्याने अडोतीशी गाठली आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. एकीकडे तापमान असताना मालेगाव तालुक्यातील काही गावात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना काही अंशी उकाड्यातून सुटका मिळाली आहे.