वन विकास महामंडळाच्या बल्लारशा आगार विभागातून ‘सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट’अंतर्गत दिल्ली येथे उभारल्या जात असलेल्या नव्या संसद भवन बांधकामाकरिता आजतागायत जवळपास ३०० घनमीटर सागवान लाकडाची इमारत खरेदी करण्यात आली आहे. दोन दिवसात २२ कोटींचे सागवान विक्री करण्यात आले असून २०२२-२०२३ मध्ये १६५ कोटींच्या सागवानाची या आगारातून विक्री झाली आहे.

१०० कोटी रुपयाचा महसूल गोळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रात वन विकास महामंडळ हे शासनाचे अंगीकृत व्यवसाय केंद्र आहे. महामंडळात दर्जेदार सागवानाची निर्मिती करून त्याची विक्री केली जाते. वनविकास महामंडळातीले दर्जेदार सागवानाचा भारताच्या संसद भवनासाठी वापर होत असल्याने ही बाब महामंडळासाठी गौरवास्पद आहे. ७ जून २०२२ रोजी बल्लारशा विक्री आगारातून जाहीर लिलावात ‘फायनल फिलिंग’ दर्जेदार सागाची विक्रमी विक्री करून महामंडळाला दोन दिवसात २२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. येथून २०२२-२०२३ या वर्षात १६५ कोटी रुपयांच्या वनउपजाची विक्री झाली असून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झाला आहे. ऑफलाइन लिलावात जवळपास १०० कोटी रुपयाचा महसूल महामंडळाला मिळाला आहे.