नागपूर : नागपूर ते मुंबई आणि पुण्यापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने रेल्वे मार्गाची चाचणी पूर्ण झाली आहे. अंतिम अहवाल प्राप्त होताच नागपूर-पुणे-नागपूर तसेच नागपूर-मुंबईदरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीणा यांनी खासदारांना दिली.

खासदारांनी नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची मागणी केली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीणा यांच्या उपस्थितीत नागपूर विभागीय कार्यालयातील समाधान सभागृहात नागपूर व भुसावळ विभागातील खासदारांसोबत बैठक घेण्यात आली.

नागपूर-पुणे-नागपूर मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय झाला असतानाही अद्याप सुरू झाली नसल्याचा मुद्दा खासदारांच्या बैठकीत चर्चेत आला. बैठकीत रेल्वे व्यवस्थापक यांच्यासह खासदार डॉ. दिनेश बच्छाव, राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे, भास्कर मुरलीधर भागरे (दिंडोरी), बळवंत बसवंत वानखेडे (अमरावती), बटी विवेक साहू(छिंदवाडा), श्यामकुमार बर्वे ज (रामटेक), संजय उत्तमराव F देशमुख (पवतमाळ-वाशीम), दर्शनसिंह चौधरी (होशंगाबाद), अमर काळे (वर्धा) आणि अनुप संजय धोत्रे (अकोला) उपस्थित होते. यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे यांनी रामटेक ते गोटेगाव रेल्वे मार्गाची मागणी केली आहे, तर खासदार अमर काळे यांनी वर्धा जिल्ह्यातील रेल्वे पुलाची मागणी रेटून धरली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर ते पुणे आणि पुणे ते नागपूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा के किमान एक ते दीड तासांचा वेळ वाचणार आहे. पुण्याहून सद्यःस्थितीत तीन वंदे भारत एक्सप्रेस धावतात. यात सोलापूर-मुंबई, पुणे-कोल्हापूर व पुणे-हुबळी या वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. नागपूर ते पुणे आणि पुणो ते नागपूर ही सेवा आठवड्यातून सहा दिवस असणार आहे. एक दिवस रेकच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी राखीव असणार आहे. प्रवाशांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा खासदारांनी व्यक्त केली. मध्य रेल्वेच्या भुसावळ आणि नागपूर विभागातील खासदारांसोबत वार्षिक बैठकीत खासदारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली. मुख्य रेल्वे स्थानक तसेच अजनी रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या पुनर्विकास कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.