नागपूर : आईपासून दूरावलेला बिबट्याचा बेवारस बछडा वर्ध्यातील करुणाश्रमात आला तेव्हा डोळ्याने बघू शकत नव्हता. ‘ॲन्ट्रोप्रीऑन ऑफ आईज’ या आजाराने त्याला ग्रासले होते. तब्बल तीन महिन्याच्या अथक उपचारानंतर यश आले आणि आता हा ‘जग्गू’ बिबट स्वत:च्या डोळ्यांनी जग बघतोय. वर्धा येथील करुणाश्रमात दीड वर्षांपासून दाखल झालेला जग्गू आता १७ महिन्यांचा झालाय. आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या बछड्याची लहानपणापासून वर्ध्याच्या करुणाश्रमात विशेष काळजी घेतली जाते आहे.

जवळजवळ दीड वर्ष आधी अवघ्या सहा दिवसांचा असताना वाशिम वनविभागाला आई पासून दुरावलेला एक बिबट्याचा बछडा बेवारस स्थितीत आढळला त्यानंतर तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बछड्याला आई मिळावी म्हणून सात दिवस अथक प्रयत्नही केले. बछड्याचे आईसोबत मिलन झाले नाही. त्यामुळे पुढील सांभाळ व देखरेखीसाठी वर्धेतील करुणाश्रमात त्याला दाखल करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडिओ ::

त्याची रक्त तपासणी व वैद्यकीय चाचणी केली असता तो दुर्धर आजाराने ग्रासित असल्याचे समजले. त्यानंतर त्याच्या उपचाराला सुरुवात करण्यात आली. त्याचे डोळे जन्मापासून उघडले नसल्याने त्याला ‘एन्ट्रोप्रीऑन ऑफ आईज’ हा आजार असल्याचे निष्पन्न झाले. सदर बछड्याच्या डोळ्यातील वरच्या पापण्या डोळ्यांच्या आतील भागात जन्मतःच गुंडाळून होत्या. तब्बल अथक उपचारानंतर यश प्राप्त झाले. तो आता स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकतोय .