नागपूर : ‘लंडन स्ट्रीट’वर जागतिक दर्जाचे भाजी विक्री केंद्र उभारण्याचे स्वप्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाहिले होते. ते आता पूर्णत्वास आणण्याच्या अनुषंगाने पाऊल उचलण्यास सुरुवात झाली आहे. ‘लंडन स्ट्रीट’वर उभारल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या भाजी विक्री केंद्राची रचना अंतिम करण्यात आली आहे.

नागपूर महापालिकेने सोमवारी ‘लंडन स्ट्रीट’वरील अधिकृत रचना सार्वजनिक केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरचा विस्तार आणि भवितव्य लक्षात घेऊन ‘लंडन स्ट्रीट’वर पूर्णत: सुसज्ज भाजी विक्री केंद्र उभारण्याबाबत सूतोवाच केले होते. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाची आढावा बैठक घेतली होती. यानंतर सोमवारी डिझाइनला अंतिम स्वरूप देण्यात आले. लंडन स्ट्रीटचा परिसर राजेंद्र नगर ते वर्धा रोडपर्यंत आहे. महापालिका त्याचा विकास करत आहे. जयताळा संकुलातील प्लॉट क्रमांक १९ मध्ये महापालिका सर्व सुविधांनी युक्त येथे जागतिक दर्जाचे भाजी विक्री केंद्र बनवणार आहे.

हेही वाचा – वर्धा : अखेर त्या बिबट्याचा उपचारादरम्यान कावीळने मृत्यू

हेही वाचा – गोंदिया: चालत्या स्कुटीला अचानक लागली आग; गाडी जळून झाली झाली राख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच ‘लंडन स्ट्रीट’वर रॅडिसन चौकात महापालिकेने मॉल बांधला आहे. अनेक मोठमोठ्या ब्रँड्सनी आपली दुकाने येथे उघडली आहेत. सोबतच अनेकांनी आपल्या कार्यालयासाठीही येथे जागा घेतली आहे.