लोकसत्ता टीम

नागपूर: लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला बुधवारपासून सुरूवात झाली. नागपूरमध्ये पहिल्याच दिवशी एक अर्ज दाखल झाला. उमेदवाराचे नाव आहे व्यंकटेश्वरा स्वामी. ते मूळचे कर्नाटकचे व आता त्यांचे सोलापूर जिल्ह्यात वास्तव्य आहे. नागपूरहून भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रिंगणात उतरणार आहेत. गडकरीचा पूरक उमेदवार असल्याचा दावा स्वामींनी केला .

Shinde Senas struggle in BJPs stronghold washim cm Eknath Shindes bike rally in Washim today
भाजपच्या बालेकिल्यातच शिंदे सेनेची दमछाक, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाशीममध्ये बाईक रॅली
Devendra Fadnavis always telling lies Criticism of Sushilkumar Shinde
रेटून खोटे बोलण्याचे फडणवीसांवर संस्कार; सुशीलकुमार शिंदे यांचा टोला
Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
Sangli, Vishal Patil, vishal patil sangli,
सांगलीची जागा कॉंग्रेसलाच मिळेल, विशाल पाटलांचा विश्वास; खासदार संजयकाका पाटलांना मैदानात येण्याचे आव्हान

नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले शहर राजकीयदृष्ट्या तितकेच महत्वाचे आहे. कधीकाळी कॉंग्रेसचा दबदबा असलेल्या या शहरातून २०१४ पासून भाजपचे दिग्गज नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विजयी होत आहेत. याही वेळी त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. अद्याप त्यांनी अर्ज दाखल केला नाही. भाजप आणि देशाच्या राजकारणातील गडकरी यांचे स्थान लक्षात घेता नागपूरच्या निवडणूक घडामोडींकडे सर्व देशाचे लक्ष लागलेले असते. या पाश्र्वभूमीवर सोलापूरच्या स्वामींनी थेट नागपुरात येऊन गडकरी यांच्या निवडणूक रिंगणात उडी घेणे लक्षवेधी ठरले आहे.

आणखी वाचा- “विरोधक हिंदू विरोधी, मग गुजरातमध्ये हिंदू शेतमजुरांची मजुरी किती वाढवली?” जावंधिया यांचा सवाल

स्वामी म्हणतात ‘ माझी उमेदवारी गडकरी यांना पूरक आहे.’ पण त्यांना भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले नाही. विशेष म्हणजे स्वामी यांनी अर्ज परत घेणार नाही असे सांगितले. पण त्यांनी दाखल केलेला अर्ज छाननीत फेटाळला जाण्याची शक्यता अधिक आहे. स्वामी यांनी त्यांच्या अर्जात भाजप उमेदवार असे नमुद केले असले तरी त्यासोबत बी फॉर्म जोडला नाही. एकीकडे ते अर्ज मागे घेणार नाही, असे सांगतात पण गडकरी यांच्या कामामुळे प्रभावित झाल्याचे सांगून त्यांचा प्रचार करणार असेही स्पष्ट करतात. स्वामी यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात १०७ कोटींची असल्याचे नमुद केले आहे. यापूर्वी २०१९ मध्ये सोलापूरमधून निवडणूक लढवली होती.